शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:29 IST

जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनची उपलब्धता अनिवार्य आहे. अशातच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील आॅक्सिजन पुरवठादारांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.अकोल्यात आॅक्सिजन निर्मितीचे दोन प्लान्ट असून, त्यामार्फत सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांना आॅक्सिजन गॅसचा पुरवठा केला जातो; मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढली असून, आॅक्सिजनची मागणीदेखील वाढली आहे. सर्वोपचार रुग्णालयाला आॅक्सिजन सिलिंडरचा मुबलक पुरवठा होत असला, तरी इतर खासगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांसाठी नागपूर आणि जालना येथून आॅक्सिजन सिलिंडरची मागणी करावी लागत आहे. नागपूर येथून आठवड्यातून एकदाच टँकर येतो. त्यामध्ये केवळ ९५० सिलिंडर भरल्या जात असल्याने खासगी रुग्णालयांचे अडीच दिवसांचे काम भागते. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास खासगी रुग्णालयात आॅक्सिजनअभावी रुग्णांना जीव गमवावा लागेल. ही परिस्थिती उद््भवू नये, यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. यासंदर्भात खासगी रुग्णालयांना आॅक्सिजन पुरवठा करणाºया पुरवठादार डॉ. स्वप्नील ठाकरे, जयेश वोरा, अनूप बगडिया आदींनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

अमरावतीहून आॅक्सिजनची मागणीसूत्रांच्या माहितीनुसार, गत दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात आॅक्सिजनचा तुटवडा असल्याने तेथील प्रशासनाने अकोला जिल्हा प्रशासनाला आॅक्सिजनची मागणी केली होती; मात्र जिल्ह्यातच आॅक्सिजनचा तुटवडा असल्याने अमरावती जिल्ह्याला आॅक्सिजनचा पुरवठा करणे शक्य झाले नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल