शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वखार महामंडळाच्या नफ्यासाठी जादा दराचा खटाटोप

By admin | Updated: November 16, 2016 02:13 IST

३३३ टक्के अधिक दराला खाद्य निगमचाही हातभार.

सदानंद सिरसाट अकोला, दि. १५- केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोला गोदामात पायाभूत दराच्या १४५ टक्के अधिक दराने शासकीय धान्य वाहतुकीचे काम सुरू असताना तेच काम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने तब्बल ३३३ टक्के अधिक दराने दिले. त्यासाठी बाजारातील कामाचे दर निश्‍चित करणार्‍या समितीचा अहवालच संशयास्पद असल्याचे आताच्या निविदा प्रक्रियेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो अहवाल देणारे अधिकारी, त्याला मंजुरी देणारे खाद्य निगमच्या अधिकार्‍यांची चौकशी केल्यास शासनाला कोट्यवधींचा चुना लावणार्‍यांचे चेहरे पुढे येणार आहेत. भारतीय खाद्य निगमकडून जिल्हाधिकार्‍यांना शिधापत्रिकाधारकांसाठी धान्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी खाद्य निगम धान्याची वाहतूक आणि साठा करते. आधी खाद्य निगमचे धान्य अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात येत होते; मात्र त्या ठिकाणी तीन कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीच्या धान्याचा घोटाळा झाला. त्यामुळे खाद्य निगमने या कामासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम भाड्याने घेतले. तसेच रेल्वे माल धक्का ते वखारच्या गोदामापर्यंत वाहतूक आणि साठा करण्याची जबाबदारीही महामंडळाकडे दिली. महामंडळाने निविदा प्रक्रियेतून तब्बल ३३३ टक्के अधिक दराच्या निविदाधारकाला काम दिले. हा प्रकार भारतीय खाद्य निगम, राज्य वखार महामंडळ आणि कंत्राटदारांच्या संगनमताने मिळून कोट्यवधींच्या शासन निधीला चुना लावण्यासारखा आहे. - आठ टक्के सेवा शुल्कासाठी लुटीचा धंदाधान्याची वाहतूक आणि साठा करण्यासाठीचा खर्च भारतीय खाद्य निगमकडून केला जातो. सोबतच गोदामभाडेही दिले जाते. या कामांसाठी दरमहा होणार्‍या एकूण देयकाच्या आठ टक्के रक्कम ही सेवा शुल्काच्या रूपात वखार महामंडळाला मिळते. त्यावरच महामंडळाचा व्यवसाय होतो. कंत्राटदाराचे जेवढे जास्त देयक निघेल, त्याच्या आठ टक्के रक्कम महामंडळाची, असे असल्याने देयकाची रक्कम वाढविण्यासाठी ३३३ टक्के दराने काम देण्याचा प्रताप करण्यात आला. - भारतीय खाद्य निगमही तेवढेच जबाबदारनिविदा मंजुरीपूर्वी भारतीय खाद्य निगमकडून बाजार सर्वेक्षण समितीचा अहवाल तयार केला जातो. जून २0१४ मध्ये निगमचे हेच काम केंद्रीय वखार महामंडळाकडे होते. त्या कामाचा दर १४५ टक्के अधिक होता; मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत तब्बल ३३३ टक्के अधिक दराला समितीने मंजुरी कशी दिली, हा मुद्दा आता संबंधितांची अडचण वाढविणारा आहे. त्यातच आता ते काम ६१ टक्के अधिक दरानेच होणार आहे, हे विशेष.