शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या बायपासवरील उड्डाणपूल होतोय अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 13:54 IST

जुन्या बायपास मार्गावरील उड्डाणपूल आता अरुंद बांधण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाशिम बायपास मार्गावर गत काही दिवसांपासून दुसऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले; मात्र यातील मूळ अडचण अजूनही दूर झालेली नाही. अनेक पर्याय शोधून काही उपाय न झाल्याने जुन्या बायपास मार्गावरील उड्डाणपूल आता अरुंद बांधण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. प्रस्तावित पुलाची रुंदी १२ मीटर होती; मात्र जागेअभावी आता ८.५ मीटरची रुंदी या पुलाची राहणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटित केलेल्या अकोल्यातील दोन्ही उड्डाणपुलांच्या निर्मितीला सुरुवात झाली. कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून तर क्रिकेट क्लबच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या उड्डाणपुलाचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू असले तरी जुन्या वाशिम बायपास मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम वर्षभरापासून सातत्याने रखडलेले होते. जेल चौकापासून नेहरू पार्ककडे जाणाºया मार्गावर उड्डाणपुलासाठी जागा मिळत नव्हती. एका बाजूने खासगी रुग्णालय, एनसीसी कार्यालय, बीएसएनएल अधिकाऱ्यांची वसाहत, हुतात्मा स्मारक आदी शासकीय जागांचे भूखंड आहेत.दुसºया बाजूने निवासी वसाहत आहे. या मार्गाची रुंदी २४ फूट असल्याने यावर १२ फूट रुंदीचा उड्डाणपूल बांधणे अशक्य होते. जमीन अधिग्रहित करण्याच्या सबबीखाली एक वर्ष ताटकळत राहिल्यानंतरही पर्याय निघाला नाही. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने उड्डाणपुलाची रुंदी ८.५ आकाराची करीत प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली आहे. आता उड्डाणपुलाची रुंदी ८.५ आणि उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना ५.५ चा सर्व्हिस रोड सुटणार आहे. उर्वरित ४.५ फूट जागा पादचारी यांच्यासाठी शिल्लक ठेवली जाणार आहे. नाईक हास्पिटल ते निमवाडीपर्यंत विस्तारित होत असलेल्या या उड्डाणपुलासाठी एकूण नऊ पिल्लरची उभारणी होत आहे. त्यातील पाच पिल्लर उभारणीचे खोदकामही झाले असून, या उड्डाणपुलाच्या निर्मितीची गतीही आता वाढली आहे.

टॅग्स :Akolaअकोला