शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओवा पिकाचे क्षेत्र वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:31 IST

अल्प प्रमाणात असलेले हे पीक आता राज्यात ४, हजार २०० हेक्टरवर वाढले आहे.

अकोला : ओवा मसाले पीक आहे. हे पीक राज्यात आपत्कालीन पीक म्हणून पेरणी केली जाते; परंतु आता नियमित पेरणीवर भर दिल्या जात असून, पश्चिम विदर्र्भातील खारपाणपट्ट्यत हा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रतिक्विंटल १० ते ११ हजार रुपये दर या पिकाला मिळत असल्याने शेतकरीही या पिकाकडे वळत आहेत. म्हणूनच अल्प प्रमाणात असलेले हे पीक आता राज्यात ४, हजार २०० हेक्टरवर वाढले आहे. यातील सर्वाधिक ४ हजार हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.ओवा मसाले पीक आता नगदी पिकाचे, इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन व उत्पन्न जास्त आहे. ओवा पीक तसे उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सरासरी ८ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव व उत्पादन खर्च कमी आणि पेरणी ते काढणीपर्यंत एकरी खर्च ७ ते ८ हजार असल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी या पिकाची कास धरली आहे. गत दोन वर्षापूर्वी दीड हजार हेक्टर असलेले हे क्षेत्र पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या चार जिल्ह्यात चार हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील गंगाखेड, बीड, नांदेड, जळगाव खान्देश, धुळे, नंदुरबार जिल्ह्यतील शेतकरीही आता हे पीक घेत आहेत. विशेष म्हणजे हे पीक वन्य प्राणी, जनावरे खात नसल्याने नुकसान यापासून नुकसान होत नाही.मूग, उडिदाच्या क्षेत्रावर आपत्कालीन पीक म्हणून आॅगस्ट महिन्यात ओवा पीक लावगड करण्यात येते; परंतु डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने आता हे पीक आॅक्टोबर महिन्यात घेतले जाते; परंतु यासाठी सिंचनाची गरज आहे. गतवर्षी पाऊस, धुके याचा परिणाम ओव्यावर झाला आहे. त्यामुळे एकरी तीन क्विंटलचा उतारा आला. दोन वर्षापूर्वी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकºयांना एकरी ३ हजार रुपये अनुदान देण्यात आले होते. आता हे अनुदान बंद झाले आहे.

- ओवा पिकाचे क्षेत्र वाढले आहे. पेरणी ते काढणीपर्यंतचा खर्च कमी आहे. चांगले दर आहेत. तसेही शेतकºयांनीही पिकांची फेरपालट करावी, म्हणजे पीक उत्पादन वाढण्यास मदत होईल.डॉ. एस.एम. घावडे,विभाग प्रमुख (शास्त्रज्ञ),भाजीपाला संशोधन केंद्र,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती