शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांना लागू केलेली भाडेवाढ नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:46 IST

अकोला : महापालिका प्रशासनाने अकोलेकरांच्या मालमत्ता करात २८ ते ३0 टक्के दरवाढ केली. यासंदर्भात शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित करीत शासनाला जाब विचारला असता शासकीय जागेवरील दुकानांसह मनपाच्या संकुलांमधील व्यावसायिकांना लागू केलेली भाडेवाढ रद्द करीत नगर परिषदेच्या धर्तीवर नवीन दर लागू करणार असल्याचे नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सभागृहात नमूद केले. 

ठळक मुद्देआ. गोपीकिशन बाजोरिया यांची लक्षवेधीजिल्हाधिकार्‍यांकडे होईल बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने अकोलेकरांच्या मालमत्ता करात २८ ते ३0 टक्के दरवाढ केली. यासंदर्भात शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित करीत शासनाला जाब विचारला असता शासकीय जागेवरील दुकानांसह मनपाच्या संकुलांमधील व्यावसायिकांना लागू केलेली भाडेवाढ रद्द करीत नगर परिषदेच्या धर्तीवर नवीन दर लागू करणार असल्याचे नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सभागृहात नमूद केले. नियमापेक्षा जादा कर आकारणी झालेल्या नागरिकांचा तिढा निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन डॉ. पाटील यांनी यावेळी दिले. महापालिका प्रशासनाने प्रत्येक चार वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून दोन टक्के दराने सुधारित कर प्रणाली लागू करणे अपेक्षित असताना मालमत्ता करांत अव्वाच्या सव्वा दरवाढ केली. मनपा क्षेत्रातील शासनाच्या जागेवर उभारलेल्या तसेच मनपाच्या मालकीच्या व्यावसायिक संकुलातील दुकान  व्यावसायिकांना चक्क दहा ते पंधरा पट अधिक दराची भाडेवाढ केल्याचा मुद्दा शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात उपस्थित केला. मनपाचे धोरण पाहता शासनाने त्रिसदस्यीय समिती नेमून त्यामध्ये जिल्हाधिकारी, आयुक्त व सहायक संचालक नगररचनाकार यांची नेमणूक करण्याची मागणी विधान परिषदेच्या सभागृहात आ. बाजोरिया यांनी लावून धरली. 

काय म्हणाले नगर विकास राज्यमंत्री?आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी उत्तर दिले. शहरातील मालमत्तांवर अत्यल्प कर लागू असल्यामुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनाने ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा  निर्णय घेतला. मनपाच्या अधिनस्त असलेल्या जागेवर वार्षिक भाडेपट्टय़ावर व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना ‘पीडब्ल्यूडी’च्या धर्तीवर भाडे  आकारण्यात आले. ही भाडेवाढ मोठय़ा प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालमत्ता कर आकारणीचे अधिकार मनपाला असल्यामुळे या प्रयोजनासाठी अन्य कोणत्याही समितीची नियुक्ती करणे सुसंगत ठरणार नाही. तरीसुद्धा ज्या  नागरिकांना नियमापेक्षा जादा कर आकारणी झाली असेल त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची संयुक्त बैठक घेऊन प्रकरण निकाली काढण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.