शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा ६ ऑगस्टपासून काम बंद!

By admin | Updated: July 24, 2015 23:45 IST

अधिका-यांची मनमानी, थकीत वेतनाच्या मुद्यावर अकोला मनपा आयुक्तांना इशारा.

अकोला : स्थानिक अधिकारी-कर्मचार्‍यांना दिली जाणारी वागणूक, वारंवार बजावल्या जाणार्‍या नोटीसचा मुद्दा उपस्थित करीत संबंधित अधिकार्‍यांची मनमानी बंद करा, तसेच थकीत वेतन अदा न केल्यास ६ ऑगस्टपासून महापालिकेचे कामकाज बंद करणार असल्याचा इशारा मनपा कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी आयुक्त सोमनाथ शेटे यांना देण्यात आला. मनपाच्या प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशातून मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची मोहीम सुरू केली. अवैध नळ जोडणीचा शोध घेऊन दंडात्मक मोहीम आखण्यात आली. याकरिता सर्वच विभागातील कर्मचार्‍यांची मदत घेण्यात येत असली तरी उत्पन्नात मात्र वाढ झाली नाही. सर्व कर्मचार्‍यांना विविध मोहिमेत गुंतवल्याने टॅक्स वसुलीचे कामकाज पूर्णत: ठप्प पडल्याचा आरोप कर्मचारी संघर्ष समितीने केला आहे. मनपाच्या उत्पन्नात व वसुलीत वाढ झाल्याचा गवगवा होत असताना चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांचे वेतन थकीत कसे, असा सवाल संघर्ष समितीने उपस्थित करीत मडावी यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला. स्थानिक अधिकारी-कर्मचार्‍यांना सर्वांंसमक्ष अपमानीत करणे, एकेरी भाषेत बोलणे तसेच वारंवार नोटीस देण्याच्या प्रकारामुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा मुद्दा समितीने आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यासमक्ष उपस्थित केला. अधिकार्‍यांनी मनमानी बंद करावी, तसेच थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्याचा निर्णय लवकर न घेतल्यास येत्या ६ ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला. यावेळी समितीचे अध्यक्ष पी.बी.भातकुले, कैलास पुंडे, अनिल बिडवे, राजेंद्र घनबहाद्दूर, अनुप खरारे, शांताराम निंधाने, विठ्ठल देवकते, विजय सारवान, प्रताप झांझोटे, गुरू सारवान आदींसह कर्मचारी उपस्थित होते.