शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅन्सरला कॅन्सल करा’ परिषदेचे आज आयोजन

By admin | Updated: April 24, 2017 01:55 IST

तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती : महिलांमधील कर्करोगनिदान, प्रतिबंध विषयावर होणार ऊहापोह

अकोला: ‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटल यांच्या वतीने सखी मंच सदस्यांसाठी कर्करोगासंबंधी माहिती देणाऱ्या ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.२४) माहेश्वरी भवन, अकोला येथे सकाळी ११ वाजता ही परिषद होणार असून, त्यात कोकिलाबेन हॉस्पिटलमधील प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ. इम्रान निसार शेख, डॉ. नवीता पुरोहित हे मार्गदर्शन करणार आहेत.‘लोकमत’ने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या साथीने कर्करोगाबद्दल जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. कर्करोगाचे लवकरच निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो, हे समजावून या घातक आजाराबाबत लोकांच्या मनात रुजलेली भीती कमी करण्यसाठी याअंतर्गत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच हा आजार कसा बरा झाला आणि रुग्ण सामान्य जीवन कसे जगू लागले, हे दाखविण्यासाठी कर्करोगावर मात केलेल्या व्यक्तीचे अनुभव यात मांडले जाणार आहेत. याअंतर्गत पथनाट्य, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि राज्यभरातील डॉक्टरांना प्रशिक्षण अशा विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबात जनजागृती करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यामुळे कर्करोग पूर्णत: नियंत्रणात आल्याची उदाहरणे आपल्यापुढे आहेत. त्यामुळे या आजाराची लक्षणे समजून घेऊन योग्य वेळेत त्याचे निदान करून घेणे, हाच कर्करोगाच्या विळख्यातून सुटण्याचा राजमार्ग आहे; मात्र ७० टक्के लोक याची माहिती घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. ‘आपल्याला कुठे हा आजार झाला आहे, मग कशाला घ्या त्याची माहिती!’ असा त्यांचा दृष्टिकोन असतो. उर्वरित ३० टक्के लोक उत्सुकतेने याबाबत सर्व माहिती घेतात; परंतु या आजाराची सर्वच लक्षणे त्यांना स्वत:मध्ये दिसत असल्याचे त्यांना भासते. त्यामुळे ते अक्षरश: हादरून जातात. ही वेळ येऊ नये यासाठी या आजाराची सविस्तर माहिती या परिषदेत देण्यात येणार आहे.सखींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 9922200063या क्रमांकावर संपर्क साधावा.