शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय अविष्कार महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:53 IST

अकोला: संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती अंतर्गत जिल्हास्तरीय अविष्कार २0१८ महोत्सवाचे महाविद्यालयीन स्नातक, स्नातकोत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी २0१८ चे आयोजन १७ डिसेंबर रोजी शिवाजी महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे.

अकोला: संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती अंतर्गत जिल्हास्तरीय अविष्कार २0१८ महोत्सवाचे महाविद्यालयीन स्नातक, स्नातकोत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी २0१८ चे आयोजन १७ डिसेंबर रोजी शिवाजी महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एकनाथ उपाध्ये राहतील, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे राहतील. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अविष्कार महोत्सवामध्ये सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विद्यापीठाचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करावे आणि समाजपयोगी संशोधन प्रकल्प सादर करण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देषमुख, संचालक डॉ.डी.टी. इंगोले, नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य, समन्वयक डॉ. आनंद अस्वार यांनी केले आहे. या महोत्सवासाठी समन्वयक म्हणून डॉ.जी.व्ही. कोरपे, सहसमन्वयक डॉ.ए.बी. पांडे आहेत. विद्यार्थ्यांनी महोत्सवासाठी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी. युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासोबत त्यांच्यातील चिकित्सक वृत्तीला चालना देणे या भूमिकेतून अविष्काराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जिल्हास्तरावर उत्कृष्ट ठरलेले संशोधन प्रकल्प राज्य व राष्ट्रीय स्तरासाठी निवडले जातात. अविष्कारमध्ये मानव्य शाखा, भाषा व कला शाखा, वाणिज्य व्यवस्थापन व विधी, विज्ञान, कृषी व वैद्यकीय शास्त्र, आरोग्य व औषधी निर्माण शास्त्र या पाच शाखांमधील स्नातक, स्नातकोत्तर एम. फिल, पीएच.डी.चे विद्यार्थी व आचार्य पदवीसाठी संशोधन करणारे शिक्षक संशोधन प्रकल्प सादर करू शकतात. प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त ४0 संशोधन प्रकल्प विद्यापीठ स्तरावर पाठविले जातात. अविष्कार महोत्सवाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. आशिष राऊत, प्रा. डॉ. संजय खडक्कार, डॉ. अंजली कावरे, डॉ. अनिल राऊत, डॉ. अर्चना पेठे, डॉ. संजय शेंडे, डॉ. संजय पल्हाडे, डॉ. जीवन पवार, डॉ. दीपक कोचे, डॉ. श्रद्धा थोरात, डॉ.एस.ई. निश्चि, डॉ. राहुल मोहोड, डॉ. उमेश घोडेस्वार आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठ