अतिक्रमणाने वाहतुकीला खाेळंबा
अकाेला : शहरात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीला माेठी अडचण निमार्ण झाली आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक शाखेने यावर ताेडगा काढण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
बेशिस्त ऑटाेंचा धुडगूस
अकाेला : शहरात बेशिस्त ऑटाेचालकांमुळे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. राेडवरून ऑटाे चालविताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा विचार न करता प्रवासी दिसताच अचानक ब्रेक दाबून ऑटाे थांबविण्याचा प्रकार प्रचंड वाढत आहे. त्यामुळे अपघात हाेत आहेत.
श्वानांचा हैदाेस
अकाेला : माेठी उमरी रेल्वे पुलाजवळ श्वानांचा प्रचंड हैदाेस आहे. वाहनचालकांच्या अंगावर हे श्वान धावत असल्याने या ठिकाणी काही वाहनचालक वाहनावरून खाली काेसळल्याचे वास्तव आहे. मनपा प्रशासनाने या श्वानांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
वाशिम बायपास चाैकात वाहतूक विस्कळीत
अकाेला : वाशिम बायपास चाैकात सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक जाम हाेत असल्याचे चित्र आहे. दिवसभरात दर तासाला वाहतूक जाम हाेत असल्याने माेठा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या राेडची एक बाजू तयार करण्याची मागणी हाेत आहे.