शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात सेंद्रिय भाजीपाला उत्पादनावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 15:10 IST

अकोला : प्रत्येकाला पोषक अन्न मिळावे, ते अन्न विषमुक्त असावे, यासाठीचे प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात असले तरी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशातील पहिला सेंद्रिय शेती अभ्यासक्रम सुरू करू न विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची पदविका दिली आहे.

अकोला : प्रत्येकाला पोषक अन्न मिळावे, ते अन्न विषमुक्त असावे, यासाठीचे प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात असले तरी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशातील पहिला सेंद्रिय शेती अभ्यासक्रम सुरू करू न विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची पदविका दिली आहे. तद्वतच सेंद्रिय पिके, भाजीपाला उत्पादनावर भर दिला असून, येथे उत्पादित भाजीपाल्याची मागणी वाढली आहे.सर्वच पिकांमध्ये वाढलेला कीटकनाशक रसायनाचा वारेमाप वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी रसायनाचा हा वापर कमी न होता अधिकच वाढला आहे. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकºयांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर सेंद्रिय पिके व भाजीपाला उत्पादन घेतले जात आहे. येथे तूर, कपाशी, मूग, उडीद आदी पिके तर सेंद्रिय पद्धतीने तयार केली जात असून, वांगे, टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर आदी भाजीपाला पिके घेण्यात येत अकोलेकरांना ही पर्वणी असल्याने भाजीपाल्याची मागणी प्रचंड वाढली असून, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्राचे विद्यार्थी येथे दररोज सकाळी ८ वाजता भाजीपाला पिकांची देखभाल, संगोपन करू न उत्पादन घेत आहेत. हाच भाजीपाला दररोज विकण्यात येतो. सध्या या प्रक्षेत्रावर वांगे, टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर आदी भाजीपाला पिके फुलली आहेत.सेंद्रिय पिके उत्पादनासाठी येथे ‘मॉडेल’ तयार करण्यात आले असून, या उत्पादनासाठी गांडूळसह विविध जैविक खत निर्मिती करण्यात येत आहे. सेंद्रिय शेती विकासावर राष्टÑीय पातळीवरील कार्यशाळाही घेण्यात येत असून, या विषयावरील तज्ज्ञांना बोलाविण्यात येते. शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत असून, शिवारफेरीत सेंद्रिय शेती मॉडेलला हजारो शेतकºयांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

- सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन येथे घेतले जात असून, विद्यार्थीच हे उत्पादन घेत आहेत. त्यासाठी त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.डॉ. व्ही. एम. भाले,कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ