शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीच आता मानवाला तारणार!

By admin | Updated: February 15, 2016 02:04 IST

स्वीत्झर्लंड येथील वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. गुरबीर भुल्लर यांची खास ‘लोकमत’शी बातचीत.

राजरत्न सिरसाट/अकोला : सेंद्रिय शेतीच आता मानवाला तारणार असल्याने जागतिक पातळीवर सेंद्रिय शेतीची चळवळ गतिमान होत आहे. भारतातही सेंद्रिय शेती विकासासाठी निश्‍चित कृषी धोरण आखण्याची गरज असल्याची माहिती सेंद्रिय शेती संशोधन संस्थेचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. गुरबीर एस. भुल्लर, स्वीत्झर्लंड यांनी खास लोकमतशी बातचीत करताना दिली. डॉ. भुल्लर तुलनात्मक शेती पद्धती कार्यक्रम अधिकारीही असून, सेंद्रिय शेतीवर ते प्रामुख्याने काम करतात. डॉ.पंजाबराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते अकोला येथे आले असताना त्यांनी सेंद्रिय शेतीची गरज व उपाय यावर लोकमतशी खास बातचीत केली.प्रश्न- सेंद्रिय शेतीची चळवळ भारतात गतिमान करण्यासाठी काय करावे लागेल?उत्तर- हे बघा, सेंद्रिय पीक आरोग्यासाठी कसे पोषक आहे आणि रासायनिक पिकांचा आरोग्यावर कसा प्रतिकूल परिणाम होतो, हे विस्तार कार्यक्रमातून शेतकर्‍यांना समजावून सांगावे लागणार आहे.प्रश्न- सेंद्रिय उत्पादनाच्या किमती अवाजवी असल्याने बाजारपेठेचा प्रश्न निर्माण होतो का?कोण म्हणतो, सेंद्रिय शेती उत्पादनाची किंमत अवाजवी आहे. याचेच शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे लागणार आहे. सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीचा तुलनात्मक अभ्यास मांडावा लागेल. आजमितीस आपण रासायनिक खते, कीटकनाशकेयुक्त अन्नधान्य खातो. त्यासोबत आपण विष सेवन करीत आहोत. सतत या विषाचे सेवन होत असल्याने मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. पर्यायाने वैद्यकीय खर्च वाढतो आहे. रासायनिक शेतीचा पर्यावरणावर दूषित परिणाम होत आहेत. हा सर्व खर्च बघितला तर सेंद्रिय उत्पादनाची किंमत रासायनिक पिकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. सेंद्रिय उत्पादनाऐवजी आपणास रासायनिक उत्पादने स्वस्त वाटतात पण, त्यासोबत आपण किती मोठे आजार घरी नेत आहोत, हे लक्षात आणून देण्याची गरज आहे.प्रश्न- पण, सेंद्रिय उत्पादने ओळखणार कसे?अर्थात बोगस सेंद्रिय उत्पादने ओळखण्यासाठी गुणवत्ता व तपासणी केंद्र लागतीलच.प्रश्न- सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी काय करावे लागेल?रासायनिक व सेंद्रिय शेती उत्पादनातील फरक व खर्चाचा ताळेबंद शेतकर्‍यांना समजावून सांगावा लागेल, आणि किरकोळ बाजारात विकल्या जाणार्‍या मालाच्या किमतीवर शेतकर्‍यांची थेट भागीदारी असली पाहिजे. तद्वतच प्रत्येक अनुदान हे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करणे क्रमप्राप्त आहे. प्रश्न - सेंद्रिय शेतीला नियमित बाजारपेठ कुठे आहे?हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठीच निश्‍चित धोरण असणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती उत्पादनांना नियमित बाजारपेठ उपलब्ध झाल्यास सेंद्रिय शेतीवर शेतकरी लक्ष केंद्रित करतील. तसेच शेतकर्‍यांसाठी सेंद्रिय पदविका अभ्यासक्रम देशपातळीवर सुरू करणे तेवढेच आवश्यक आहे. तसेच स्वामीनाथन समितीच्या शिफारशी शासनाने आता अंमलात आणण्याची गरज आहे. संशोधकांनी बाहेर पडून शेतकर्‍यांना कोणते संशोधन हवे आहे, याची शेतकर्‍यांसोबत चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. शेतकर्‍यांची गरज बघून संशोधनाची दिशा ठरवणे, पुढच्या काळात महत्त्वाचे असणार आहे.प्रश्न- सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी तुमच्या काही योजना?प्रत्येक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे गरजेचे असून, प्रत्येक धर्मगुरू ंनी आपल्या भक्तामध्ये प्रसार केल्यास त्याचे परिणाम जास्त प्रभावी ठरतील, कारण धर्मगुरू ंनी सांगितलेल्या विचारांचे भक्त तंतोतत पालन करतात, त्यामुळे परायणे, वारकरी आदींना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिल्यास सेंद्रिय शेतीचा प्रसार होईल.प्रश्न- कृषीची प्रकाशने इंग्रजीत असतात?धर्मगुरू किंवा शेतकर्‍यांमधील तज्ज्ञ शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी, कृषी विभागाने त्यांची प्रकाशने, शेती, संशोधन व नवतंत्रज्ञानाची माहिती पुस्तिका प्रादेशिक भाषेत प्रकाशित करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाने महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले पण, ते सामान्य शेतकर्‍यांना समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि प्रकाशित कृषी साहित्य शेतीपुरक असले पाहिजे.