शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू होणार!

By admin | Updated: June 25, 2017 13:52 IST

राज्यातील पहिला सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

३१ विद्यार्थ्यांना देणार प्रवेश; मागील तीन-चार वर्षांपासून होता बंदअकोला : सेंद्रिय शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता; परंतु निधी उपलब्ध झाला नसल्याने या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष झाले आहे. यावर्षी मात्र राज्यातील पहिला सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. सर्वच पिकांमध्ये कीटकनाशक रसायनांचा वाढलेला वापर मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले, तरी रसायनांचा वापर कमी न होताच वाढला आहे. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्‍यांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहे; परंतु निधीच उपलब्ध होत नसल्याने हा अभ्यासक्रम बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत कृषी विद्यापीठाने कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणे सुरू ठेवले; परंतु शेतकर्‍यांना शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ३0 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेला हा अभ्यासक्रम यावर्षी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. - अभ्यासक्रम आहे बंद राज्यातील पहिला सेंद्रिय पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता; पण मागील तीन ते चार वर्षांपासून तो बंद पडला आहे. यावर्षी पुन्हा हा अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने सेंद्रिय शेतीची आवड असलेल्या शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.- सेंद्रिय शेतीचे शेतकर्‍यांना शिक्षण देण्यासाठी सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे; परंतु निधी नसल्याने शेतकर्‍यांना शिक्षण देता आले नाही; मात्र कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावर्षी पुन्हा पदविका अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार आहे.- डॉ. व्ही.एम. भाले,अधिष्ठाता (कृषी),डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.