शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विषमुक्त, शाश्‍वत शेतीसाठी सेंद्रीय शेतीच फायदेशीर !

By admin | Updated: December 22, 2014 00:31 IST

अकोला यंथे विदर्भस्तरीय सेंद्रीय कडधान्य आणि उद्योजक परिसंवादाचे उदघाटन.

अकोला : विषमुक्त आणि शाश्‍वत शेतीसाठी सेंद्रीय शेतीला पर्याय नसून, भविष्यात सेंद्रीय शेतीच फायदेशीर ठरणार आहे. परंतु सेंद्रीय शेतमाल उत्पादनाला पूरक भाव मिळणे गरजेचे आह, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमेटी सभागृहात रविवारी सेंद्रीय शेतकरी आणि उद्योजक या विषयावर आयोजित विदर्भस्तरीय परिसंवादात डॉ. मानकर बोलत होते. व्यासपिठावर कुलसचिव ज्ञानेश्‍वर भारती,शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले,अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, एसएओ प्रमोद लहाळे, उद्योजक मनोहर भोजवाणी,महिला शेतकरी उद्योजक सरला पाटील,निखील भोजवाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.मानकर यांनी यावेळी शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी हे कृषी विद्यापीठाचे प्रयत्न असल्याचे सांगितले. डॉ. भाले यांनी शेतकरी आणि कृषी विद्यापीठ करीत असलेल्या सेंद्रीय शेतीत फरक विषद करताना यापुढे शेतकरी आणि कृषी विद्यापीठ यांची सांगड घालून शास्त्रीय पध्दतीने सेंद्रीय शेती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.त्यादृष्टीने कृषी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. सेंद्रीय निविष्ठा महाग आहेत.म्हणूनच सेंद्रीय मालाला चांगले भाव मिळावे, यासाठीच शेतकरी आणि उद्योजक यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लहाळे यांनी भविष्यात कमी खर्चाची शेती विकसीत करावी लागणार असून, त्यादृष्टीने कृषी विभाग, विद्यापीठाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सेंद्रीय शेतीला चांगले भाव मिळाल्यास या शेतीला चांगले दिवस येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करू न देण्याचे प्रयत्न सुरू आहे. २५ शेतकरी डाळ प्रक्रिया उद्योगासाठी एकत्र आल्यास त्यासाठी कृषी विभाग मदत करण्यात तयार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.