शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय जैवतंत्रज्ञान पध्दतीने मिळविणार बोंडअळीवर नियंत्रण ! -  आढावा सभेत डॉ.पंदेकृविचा अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:26 IST

कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेंद्रीय,जैवतंत्रज्ञान पध्दत वापरण्यात येईल असा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या खरीप आढावा सभेत सादर केला.

ठळक मुद्देयावर्षी खरीपाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी शनिवारी खरीप आढावा सभेत सुक्ष्म नियोजनावर भर दिला. कृषी विद्यापीठाने बोंडअळी व इतर किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जैवतंत्रज्ञान पध्दतीसोबत,पीक असलेल्या शेतात कामगंधसापळे लावण्यासाठीचे नियोजन केले .खारपाणपट्टयात खरीप हंगामातील सोयबीन पिकानंतर मका व ज्वारी पीक घेण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, शासकीय पातळीवर कृषी विभाग,विद्यापीठांनी नियोजन केले आहे.पूर्व विदर्भात यावर्षी धानानंतर रब्बी ज्वारी तर मध्य व पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात सोयाबीन पिकानंतर मका, करडी व रब्बी ज्वारी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. तर कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेंद्रीय,जैवतंत्रज्ञान पध्दत वापरण्यात येईल असा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या खरीप आढावा सभेत सादर केला.पावसाच्या अनिश्चिततेचा प्रतिकुल परिणाम पिक उत्पादनावर होत असून, मागील वर्षी मोठी आर्थिक झळ शेतकºयांना बसली. उत्पादन तर घटलेच,विविध किड,रोगांनी पिकांचे नुकसान केले, विदर्भातीन कापूस पिकावर जहाल गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने सर्वात जास्त नुकसान झाले.यातून अद्याप शेतकरी सावरला नसल्याने यावर्षी खरीपाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी शनिवारी खरीप आढावा सभेत सुक्ष्म नियोजनावर भर दिला. त्यांनी राज्यातील वरिष्ठ कृषी अधिकारी,कृषी विद्यापीठांचे कुलगुरू ,वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्याकडून नियोजनाची माहिती जाणून घेतली. कृषी विभाग व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शास्त्रज्ञांनी यावर्षी वापरण्यात येणारे पीक तंत्रज्ञान,एकात्मिक किड व्यवस्थापनाचे नियोजन येथे सादर केले.विदर्भात सोयाबीनचा पेरा वाढला असला तरी कापूस नगदी पीक आजही शेतकरी घेतात,मान्सून पूर्व कापूस अलिकडे घेण्याकडे शेतकºयाचा कल वाढला आहे. पण मागील वर्षी मान्सूनपूर्व व खरीप हंगामातील बीटी कापसावर बोंडअळ््यांनी आक्रमण केले. विशेष म्हणजे या बीटी कापसात बोंडअळीला प्रतिबंधक जीन असताना हे घडले. यामुळे देशभर खळबळ उडाली. यावर्षी खरबरदारीचा उपाय म्हणून बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी खरीप आढावा बैठकीत नियोजन सादर केले. या कृषी विद्यापीठाने बोंडअळी व इतर किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जैवतंत्रज्ञान पध्दतीसोबत,पीक असलेल्या शेतात कामगंधसापळे लावण्यासाठीचे नियोजन केले .पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टयात खरीप हंगामातील सोयबीन पिकानंतर मका व ज्वारी पीक घेण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उन्हाळ््यात भेडसावणाºया वैरणाचा प्रश्न काही अंशी कमी होईल,या संदर्भात शेतकºयांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. पूर्व विदर्भात पेरसावे तसेच रब्बीत ज्वारी पीक घेण्यात येईल.

- खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा सभेत सादर केले. बोंडअळीवर जैवपध्दतीने नियंत्रण मिळविण्यात येईल.तसेच मका,रब्बी ज्वारी पेरणी करण्याचा प्रयत्न राहील.डॉ. व्ही.एम.भाले,कुलगुरू , डॉ.पंदेकृवि,अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ