शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१४ डिपॉझिटर्सला २७ लाख रुपये देण्याचा आदेश

By admin | Updated: March 13, 2016 01:51 IST

श्यामलाल चंगोईवाला कुटुंबीयांना ग्राहक मंचाची चपराक.

अकोला: व्यवसाय वाढीच्या नावाखाली एजंटसह मित्रांच्या माध्यमातून १४ गुंतवणूकदारांकडून २७ लाख रुपये व्याजाने घेऊन त्याची परतफेड न करणार्‍या श्यामलाल रामलाल चंगोईवाला यांना ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलीच चपराक दिली आहे. सदर १४ गुंतवणूकदारांना त्यांची २७ लाख रुपयांची रक्कम ४५ दिवसांच्या आत व्याजासह परत करण्याचे आदेश तक्रार मंचने दिले आहेत. शहरातील रहिवासी तसेच उद्योजक भारती सुभाष पटनाईक, अवंतिका गोपाल खेतान, सुनंदा रामदास जावरकर, केतकी किशोर देशपांडे, डॉ. देवीदास हागे, रश्मी श्रीकांत पेंढारकर, श्रीकांत विष्णू पेंढारकर, श्रेयश श्रीकांत पेंढारकर व अमिताभ चतुभरुज अग्रवाल यांच्याकडून चंगोईवाला इंडस्ट्रीजचे संचालक श्यामलाल रामलाल चंगोईवाला यांनी स्वत:सह चंगोईवाला इंडस्ट्रीज, त्यांची पत्नी मीरा चंगोईवाला मुलगा देवेश चंगोईवाला यांच्या नावाने सुमारे १४ लाख ६0 हजार रुपये कर्ज स्वरूपात व्याजाने घेतले होते. धरवड पावतीच्या स्वरूपात झालेल्या या व्यवहारात देय रकमेचा भरणा करण्याच्या तारखेला चंगोईवाला यांनी हात वर केले होते. त्यामुळे सदर कर्ज देणार्‍यांनी चंगोईवाला यांना रक्कम देण्याची मौखिक विनंती केली. वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर चंगोईवाला यांनी कर्ज पुरवठा करणार्‍यांना टाळाटाळ करणे सुरू केले. त्यामुळे त्यांनी विधिज्ञामार्फत नोटीस दिली; मात्र चंगोईवाला यांनी सदर नोटीसला उत्तर दिले नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली. यावर तक्रार निवारण मंचाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर तसेच गुंतवणूकदारांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद व धरवड पावतीच्या व्यवहारासंदर्भात यापूर्वी न्यायालयाने दिलेले निकाल समोर ठेवून ग्राहक तक्रार निवारण मंचने चंगोईवाला कुटुंबीय डिफॉल्टर असल्याचे जाहीर करून त्यांना चांगलीच चपराक दिली. तसेच चंगोईवाला यांनी २७ लाख ६0 हजार रुपयांची दिवाळखोरी केल्याचे ग्राहक मंचाने आदेशात नमूद करून १४ गुंतवणूकदारांना चंगोईवाला यांनी २७ लाख ६0 हजार रुपये ४५ दिवसांच्या आतमध्ये ८ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी गुंतवणूकदारांतर्फे अँड. मनोज अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.