शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा बाग व्यवस्थापन; ३५ गावांतील शेतकऱ्यांशी ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 18:08 IST

शेतकऱ्यांना ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधून मार्गदर्शन व सल्ला देण्यात येत आहे.

अकोला: विदर्भात संत्रा हे मुख्य फळ पीक आहे. रोगराई टाळण्यासाठी या पिकाची उन्हाळ्यात काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशनच्यावतीने शेतकऱ्यांना ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधून मार्गदर्शन व सल्ला देण्यात येत आहे. शनिवारी ३४ गावांतील शेतकऱ्यांना संत्रा पिकांची काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.सध्या संत्राच्या आंबिया बहारातील फळांची गळ, पाण्याचा ताण, कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, आंतरमशागत या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठ अकोला येथील अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन केंद्र, प्रभारी डॉ. दिनेश पैठणकर तसेच सहायक प्राध्यापक वनस्पतीरोगशास्त्र डॉ. योगेश इंगळे यांनी रिलायन्स फाउंडेशनद्वारा आयोजित आडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकº­यांशी संवाद साधला.

आंबिया बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरुरीचे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते. म्हणून आंबे बहार घेताना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरुरीचे असल्याचे त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृ षीसह संचालक अनिल खर्चान यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये शेतकºयांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे प्रश्न विचारले.या ‘कॉन्फरन्स’मध्ये ३५ गावांमधील ४४ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. ज्यामधे विजय तट्टे, राजकुमार ईश्वरकर व अंकुश कोरडे यांचा समावेश होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विलास सवाणे, जिल्हा व्यवस्थापक रिलायन्स फाउंडेशन तसेच कार्यक्रम सहायक सुमित काळे यांनी केले.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती