शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

झेंडा व फलक काढण्यास विरोध

By admin | Updated: January 14, 2015 01:15 IST

अखेर पोलीस बंदोबस्तात काढला झेंडा व फलक.

अकोला: अकोला- आकोट मार्गावर लागलेला एक झेंडा व फलक काढण्यासाठी घटनास्थळावर सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावावा लागला. परिसरातील महिलांच्या विरोधामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीमही थांबवावी लागली. दरम्यान, अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविल्यानंतर मोहिमेस पुन्हा प्रारंभ झाला. पोलीस व मनपाच्या विशेष मोहिमेंतर्गत मंगळवारी दुपारी आकोट फैल परिसरात अनधिकृत फलक, झेंडे काढण्याची कारवाई करण्यात आली. रेल्वे पुलापासून कारवाईस प्रारंभ झाला. पथकाने रस्त्यांच्या कडेला विद्युत खांबांवर लागलेले फलक, झेंडे काढले आणि पथक आंबेडनगरात पोहोचले. याठिकाणी पथकाने अशोक चक्र असलेला झेंडा काढण्यास प्रारंभ केला; परंतु त्याला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आणि रेल्वे मालधक्का आणि आकोट फैल पोलीस ठाण्यालगत असलेले धार्मिक स्थळ हटविण्याची मागणी केली. त्यानंतरच झेंडा काढू दिला जाईल, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने पथकासमोर अडचण निर्माण झाली. घटनास्थळावर उपस्थित असलेले परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले व मनपाच्या अधिकार्‍यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे घटनास्थळावर आले. त्यांनीही समजूत घातल्यानंतर नागरिकांनी वंदना घेतली आणि झेंडा काढण्यास सांगितले. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये अशोक चक्र असलेला झेंडा काढण्यात आला.