पंचशील नगर, न्यू तापडीया नगर, बापू नगर, खरप, पाचपिंपळ, अकोट फाईलचा काही भाग यांना योग्य दाबाने पाणीपुरवठा शक्य होणार आहे. या भागात तूर्तास जुन्याच पद्धतीने पाणीपुरवठा सुरु आहे. या भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी परवड पाहता अकोट फाईल येथील पाण्याच्या टाकीच्या निर्मितीसाठी दिवंगत वंचित गटनेत्या अॅड. धनश्री देव अभ्यंकर यांनी पुढाकार घेत मागणी केली होती. या मागणीचा विचार करत ही टाकी मंजूर झाली होती. अमृत योजनेत अकोट फाईल भागात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवरुन वरील संदर्भाकरीता भाग जोडल्यास या भागातील जलवाहिनीच्या अंतिम टोकावर योग्य दाबानुसार पाणीपुरवठा करता येईल. त्याच बरोबर पाण्याची नासाडी थांबेल तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळेची कपात करत पाण्याची बचत होण्यास मोठी मदत मिळेल, असे या निवेदनात म्हटले आहे.
अकोट फाईल भागातील पाण्याची टाकी कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST