शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा बॅरेजच्या बांधकामाचा मार्ग मोकळा!

By admin | Updated: January 11, 2015 01:20 IST

प्रकल्पासाठी मिळाली ६.३४ हेक्टर वनजमीन.

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेजसच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या बॅरेजसाठी लागणारी ६.३४ हेक्टर वनजमीन वनविभागाने या प्रकल्पाला देण्यासाठीची मंजुरी दिली आहे.या बॅरेजच्या कामासाठी, पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्याने अकोला पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी वन विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. राज्य शासनासह नागपूर वनविभागचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे याकरिता पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांनी या संबंधीचा परिपूर्ण अहवाल भारत सरकारच्या भोपाळ येथील पर्यावरण, वन व जलपरिवर्तन मंत्रालयाकडे सादर केला होता. हा प्रकल्प बांधून झाल्यास या भागातील जनेतला फायदा होणार असल्याने भारत सरकारच्या वनसंवर्धन अधिनियम १९८0 आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार भारत सरकारने काही अटींसह या प्रकल्पाला लागणारी ६.३४ हेक्टर जमीन देण्यासाठीची मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाला लागणारी राखीव वनजमीन राज्य शासनाला देण्यासाठीची मंजुरी दिली असून, राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने गुरुवारी या आशयाचे परिपत्रक काढले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व्हे न. ३ मधील राखीव असलेली ६.३४ हेक्टर वनजमीन काटेपूर्णा प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवन संरक्षक अकोला यांनी या आदेशाची प्रत पाठविण्याची सूचना केली आहे.