अकोला : कायद्याचे राज्य आहे किंवा नाही, अशी परिस्थिती दाखविणारे चित्र मंगळवारी अकोला शहरातील काही भागात आढळून आले. खुलेआम भररस्त्यावर जुगार अड्डे सुरू असून येथे जुगारींची यात्राच भरत असल्याचे चित्र ह्यलोकमतह्ण चमूने जठारपेठ, उमरी नाका, शिवणी, कृषी विद्यापीठ परिसर, सिंधी कॅम्प परिसरात केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णदरम्यान बघावयास मिळाले.कृषी विद्यापीठ परिसरात झाडाझुडुपांच्या आश्रयाने जुगाराचे डाव रंगतात. एवढेच नाही तर शिवणी, शिवरमध्ये जुगाराचे चांगलेच पीक आले आहे. गल्लीबोळांमध्ये खुलेआम १0 ते १५ जणांचा घोळका करून जुगारी आकडेमोड करण्यात मग्न असल्याचे दिसून आले. प्रत्येक सदस्याच्या हातात आकडे लिहिलेल्या चिठ्ठय़ा, पेन व पैसे दिसून येत होते. ह्यलोकमतह्ण चमूने सिंधी कॅम्प परिसरातील कच्छी खोली, महात्मा फुलेनगर, जिरा बावडी खदान परिसरामध्ये दुपारी ४ वाजताच्या सुमारास फेरफटका मारला असता, सात ते आठ युवक घोळका करून बसल्याचे दिसून आले. या ठिकाणी गोटींच्या नंबरवर खेळ रंगला होता. घोळक्यातील प्रत्येकाला एक नंबर दिला होता. गोटीचा नंबर उघडल्यास संबंधित सदस्याला इतर सदस्य ठरलेली रक्कम देत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ह्यलोकमतह्ण चमूने त्यांचा मोर्चा जठारपेठेतील उमरी नाक्याकडे वळविला. तेथे पोलीस चौकीच्या बाजूलाच खुलेआम जुगार सुरू असल्याचे दिसून आले. थोडे पुढे गेल्यानंतर येथील जुन्या नाकाजवळील कॉर्नरवर काही वृद्ध, तरुण चिठ्ठय़ा व पैसे हातात घेऊन असल्याचे आढळले. उमरी नाक्यावरून स्टेट बँक कॉलनीकडे जाणार्या मागावर खुल्या जागेत ८ ते १0 जण चिठ्ठीपट्टीचा जुगार खेळताना आढळले. या याशिवाय जुने शहर, रामदासपेठ आणि आकोटफैल परिसरातही अड्डे सुरू आहेत. पोलीस अधून-मधून जुगार अड्ड्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा देखावा करतात. सर्व काही ह्यठरल्याप्रमाणेह्ण होत असल्याने पोलीस छाप्यातून किरकोळ रक्कम जप्त करीत प्याद्यांवर कारवाई करण्यात येते; मात्र जुगार अड्डा चालविणारा मुख्य आरोपी मोकळाच राहतो.
भरवस्तीत खुलेआम चालतात जुगार अड्डे!
By admin | Updated: February 4, 2015 01:48 IST