शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवघे विघ्ने नेसी विलया..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:26 IST

लाडक्या गणरायाचे आगमन प्रत्येकाला सुखावणारे आहे.  घराघरांत आनंद आणि प्रसन्नता आणणार्‍या बाप्पाला निरोप देताना  प्रत्येकाचे मन धीरगंभीर झाले होते. आपल्या लाडक्या गणरायाने  सर्वांंचा निरोप घेतला, तो पुढल्या वर्षी येण्यासाठी.. लाडक्या बा प्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या  मिरवणुकीला सकाळी ११ वाजता प्रथम मानाच्या बाराभाई गणपतीची  महाआरती झाल्यानंतर सुरुवात झाली. शहरातील शेकडो गणेशोत्सव  मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

ठळक मुद्देभक्तिभावाने बाप्पाला निरोप गणरायाच्या जयघोषाने आसमंत निनादला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लाडक्या गणरायाचे आगमन प्रत्येकाला सुखावणारे आहे.  घराघरांत आनंद आणि प्रसन्नता आणणार्‍या बाप्पाला निरोप देताना  प्रत्येकाचे मन धीरगंभीर झाले होते. आपल्या लाडक्या गणरायाने  सर्वांंचा निरोप घेतला, तो पुढल्या वर्षी येण्यासाठी.. लाडक्या बा प्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या  मिरवणुकीला सकाळी ११ वाजता प्रथम मानाच्या बाराभाई गणपतीची  महाआरती झाल्यानंतर सुरुवात झाली. शहरातील शेकडो गणेशोत्सव  मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. महापालिकेच्यावतीने गणेश विसर्जनासाठी गणेश घाटावर सात कुंड  सज्ज ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच गणेशभक्तांनी गणेश  घाट, निमवाडी घाट, अनिकटवर गणशे विसर्जनासाठी गर्दी करण्यास  सुरुवात केली. सायंकाळी तर भाविकांनी अनिकट, निमवाडी व  गणेश घाटावर प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी रात्री १२.३0 वाजेपर्यंंत  अविरत कायम होती. महापालिकेने याठिकाणी भाविकांच्या स्वाग तासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला होता.  निर्माल्य टाकण्यासाठी मनपाने  स्वच्छता रथांची व्यवस्था गणेश घाटावर  केली होती. मंगळवारी  शहरातील गणेश घाट, अनिकट, हरिहरपेठ, हिंगणा रोड, निमवाडी  घाटावर गणेशभक्तांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.  गणपती बाप्पा चिमुकल्यांचे लाडके दैवत. बाप्पाला निरोप देण्यासाठी  कुटुंबीयासोबत, आई-वडिलांसोबत बच्चे कंपनीने मोठी गर्दी केली  होती. चिमुकली मुले गणेश मूर्तीला हातात, डोक्यावर घेऊन  विसर्जनासाठी या तिन्ही घाटावर आणत होते. सुरुवातीला गणेशाची  आरती, विधिवत पूजन करून विसर्जन केले जात होते. गणेश  घाटावरील गर्दीच्या तुलनेत निमवाडी घाटावर विसर्जन करणार्‍या  नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती. निमवाडी  पुलावरूनही भाविक मोठय़ा संख्येने गणेश विसर्जन करीत होते. आखाडा (अनिकट), वीर हनुमान व्यायाम शाळा (जुने शहर), जय  भवानी रामभरोसे व्यायाम शाळोचा समावेश होता. 

सायंकाळी वाढली गर्दी!सकाळी ११ वाजता सार्वजनिक मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर  मिरवणुकीत केवळ २६ गणेश मंडळांचे गणपती सहभागी झाले होते.  गणपती पाहण्यासाठी यंदा सकाळी मिरवणूक मार्गांंवर नागरिकांची  गर्दी दिसून आली नाही. मात्र, सायंकाळी ४ वाजतापासून नागरिकांनी  गणपती पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. 

रात्री १२.१५ वाजेनंतर झाला समारोप !रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी लक्कडगंज येथील बाल गणेश  मंडळाची मूर्ती मिरवणुकीत रवाना होणारी शेवटची मूर्ती होती. त्यानंतर  ताजनापेठ पोलीस चौकींसमोर मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी  विशेष पोलीस महानिरीक्षक सी. वाकडे, जिल्हाधिकारी पाण्डेय व  पोलीस अधीक्षक राकेश कलासागर आदी उपस्थित होते. रात्री १२.१५  वाजेपर्यंंत ३७ गणेश मंडळांनी ताजनापेठ चौकातून गणेश घाटाकडे  प्रस्थान केले होते. यानंतर अर्जुन समाज गणेश मंडळाची मिरवणूक  रात्री १ वाजता सुरु झाली होती. -