शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २२० कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: May 19, 2017 01:32 IST

पावसाळा तोंडावर; पीक कर्ज वाटप संथ गतीने!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले असले, तरी त्यापैकी १० मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २२० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असला, तरी पीक कर्जाचे वाटप संथ गतीने सुरू असल्याची स्थिती आहे. त्यानुषंगाने यावर्षी जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीक कर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ १२ दिवसांचा कालावधी उरला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून, खरीप पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामध्ये पेरणीसाठी बी-बियाणे, खते आणि इतर खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीक कर्जाच्या मागणीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी गत १० मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २२० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत बँकांमार्फत करण्यात आलेले पीक कर्जाचे वाटप बघता, पावसाळा तोंडावर येत असला, तरी पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया मात्र संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट खरीप पेरण्या सुरू होईपर्यंत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पेरणीपूर्वी कर्जाचा लाभ मिळणार? पावसाळा तोंडावर आला असून, पेरणीसाठी बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे; परंतु पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने, बियाणे आणि खतांचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप पेरणी सुरू होण्यापूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी १० मेपर्यंत २२० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जुलै अखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक.