शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
2
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
5
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
6
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
7
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
8
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
9
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
10
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
11
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्
12
प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!
13
"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग
14
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
15
थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
16
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
17
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
18
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
19
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
20
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या

हजारो दिव्यांगांसाठी जिल्ह्यात एकच दिव्यांग कक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 3:22 PM

जिल्ह्यात तालुका स्तरावर दिव्यांग कक्षाची गरज निर्माण झाली आहे.

अकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यात एकच दिव्यांग कक्ष आहे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी हजारो दिव्यांगांना वेटींग लिस्टवर राहावे लागत आहे. अनेकदा डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांना वैद्यकीय तपासणी न करताच परतावे लागते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात तालुका स्तरावर दिव्यांग कक्षाची गरज निर्माण झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांगांसाठी दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाईन अर्ज नि:शुल्क भरून दिला जातो; मात्र अर्ज भरल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी दिव्यांगांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. अनेकदा येथे डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने वैद्यकीय तपासणीसाठी येणाºया दिव्यांगांना तसेच परतावे लागते. विशेष करून ग्रामीण भागातून येणाºया दिव्यांगांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांची वेळेत वैद्यकीय तपासणी होत नसल्याने दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.वैद्यकीय तपासणीसाठी तारखांवर तारखावैद्यकीय तपासणीसाठी दिव्यांग कक्षात येणाºया दिव्यांगांना तारखेवर तारीख दिल्या जात असल्याचे वास्तव आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत तपासणीसाठी येणाºया दिव्यांगांची संख्या जास्त आहे. हा भार कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन दिव्यांग कक्ष ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग कक्षाची गरजजिल्ह्यात सर्वोपचार रुग्णालयात एकमेव दिव्यांग कक्ष असून, त्यावर हजारो दिव्यांगांचा भार आहे. बहुतांश दिव्यांग हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेहमीच चकरा माराव्या लागत आहेत. ही बाब लक्षात घेता, दिव्यांगांसाठी तालुका स्तरावर दिव्यांग कक्षाची आवश्यकता आहे. हे कक्ष ग्रामीण रुग्णालयात स्थापन झाल्यास ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी सोईस्कर ठरणार आहे.विशेष शिबिराच्या माध्यमातून हजारो दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. असे असले, तरी येथील दिव्यांग कक्षात तपासणीसाठी येणाºया दिव्यांगांच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. हीच सुविधा ग्रामीण भागातही सुरू झाल्यास दिव्यांगांना सोईस्कर ठरणार आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला