शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे केवळ नऊ हजार थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र!

By admin | Updated: July 1, 2017 02:13 IST

अकोला-वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश; थकित ३५ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज होणार माफ !

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाने जाहीर केलेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा उपनिबंधकांकडे (डीडीआर) शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अकोला व वाशिम दोन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन्ही जिल्ह्यातील केवळ ९ हजार २२१ थकबाकीदार शेतकऱ्यांचे ३५ कोटी ४५ लाखाचे थकित कर्ज कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहे. कर्जमाफी देण्यासंदर्भात २८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शासन निर्णयातील कर्जमाफीच्या निकषानुसार, १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानुसार गत १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी आणि ३० जून २०१६ व ३० जून २०१७ पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती सादर करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हा उपनिबंधकांना (डीडीआर) देण्यात आला. त्यानुसार अकोला व वाशिम हे दोन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती ३० जून रोजी सायंकाळी जिल्हा उपनिबंधकांकडे (डीडीआर)सादर करण्यात आली. त्यानुसार ९ हजार २२१ शेतकरी थकबाकीदार कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.नियमित परतफेड करणारे ५८ हजारशेतकरी ठरणार अनुदानासाठी पात्र !जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त माहितीनुसार, ३० जून २०१६ व ३० जून २०१७ पर्यंत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात ५८ हजार ५२४ शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत. शासन निर्णयानुसार कर्जाची नियमित परतफेड करणारे हे शेतकरी २५ हजार रुपयांपर्यंतच्या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.जिल्हा बँकेमार्फत प्राप्त माहितीनुसार, ३० जून २०१६ पर्यंत अकोला व वाशिम जिल्ह्यात बँकेचे ९ हजार २२१ थकबाकीदार शेतकरी असून, त्यांच्याकडे ३५ कोटी ४५ लाख रुपये कर्ज थकीत आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणारे ५८ हजार ५२४ शेतकरी आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.- जी.जी.मावळेजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)