शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती प्रादेशिक विभागात केवळ चारच ‘पॉस’ मशीन!

By admin | Updated: March 19, 2017 02:07 IST

'कॅशलेस'च्या दिशेने एसटी महामंडळाची धिमी वाटचाल

राम देशपांडे अकोला, दि. १८- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेसुद्धा 'कॅशलेस'च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एसटीने प्रवास करणार्‍या नागरिकांना 'कॅशलेस' व्यवहार करता यावेत, यासाठी मुंबई येथील केंद्रीय कार्यालयामार्फत राज्यातील ३१ विभागांना 'पॉस' मशीन वितरित करण्यात आल्या आहेत. यापैकी अमरावती प्रादेशिक विभागाच्या वाट्याला केवळ चारच पॉस मशीन आल्या असल्याने, एसटी महामंडळाची ह्यकॅशलेसह्णच्या दिशेने अत्यंत धिमी वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. 'कॅशलेस'च्या दिशेने पावले उचलणार्‍या एसटी महामंडळाच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयामार्फत राज्यातील ३१ विभागीय कार्यालये, बसस्थानके व आगारांना 'एसबीआय'च्या 'पॉस' मशीन वितरित करण्यात आल्या. त्यापैकी केवळ चारच पॉस मशीन अमरावती प्रादेशिक विभागाच्या वाट्याला आल्या असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी ह्यलोकमतह्णला दिली. ३३ बसस्थानके व ४ विभागीय कार्यालये असा मोठा व्याप असलेल्या अमरावती प्रादेशिक विभागात दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल रोकड विभागात गोळा होतो. रिझर्व्ह बँकेने केलेल्या सूचनेनंतरसुद्धा एसटी महामंडळाने 'कॅशलेस' होण्यासाठी आरक्षण खिडक्यांवर, थेट प्रवासी गाड्यांसाठी वितरित केल्या जाणार्‍या तिकीट काउंटर्सवर अशा विविध ठिकाणी 'पॉस' मशीन लावणे अपेक्षित होते; मात्र 'कॅशलेस'साठी अत्यंत तुटपुंजा उपाययोजना केल्या जात असून, अकोला विभागाच्या वाट्याला आलेली एक पॉस मशीन मध्यवर्ती बसस्थानकावरील आरक्षण तिकीट खिडकीवर लावण्यात आली आहे. अन्य विभागात यासंदर्भात कुठलीच तजवीज करण्यात आली नसल्याने, गैरव्यवहार होणार नाही, अशी शाश्‍वती देणे अशक्य असल्याचे मत अकोला विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यांनी 'लोकमत'कडे व्यक्त केले.