शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेच्या फक्त पाच शाळांमध्ये सुरू होणार अंगणवाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 13:24 IST

अकोला : महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बालविकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्याचे समोर आले आहे.

- आशिष गावंडेअकोला : महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बालविकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्याचे समोर आले आहे. बालविकास विभाग व मनपाच्या संयुक्तिक सर्व्हेनंतर महापालिकेच्या ३३ पैकी फक्त पाच शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करता येणार आहे. यामुळे मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होत नसल्याने मनपा शाळांवर समायोजनाची परिस्थिती ओढवली. गोरगरीब कुटुंबांना महागड्या कॉन्व्हेंटचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरू केले. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बालवाडीचे वर्ग सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही, तोच एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्तांनी बालवाडी व त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या शहरातील अंगणवाडीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. मनपाने शहरातील १७९ अंगणवाड्यांसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्यास मनपाचा आर्थिक भार कमी होण्यासोबतच अंगणवाडीतील विद्यार्थी पुढील पहिल्या वर्गासाठी मनपा शाळेत प्रवेश घेऊ शकतील. यामुळे मनपा शाळांची पटसंख्या कायम राहण्यासोबतच शासनाचा उद्देश सफल होण्यास मदत होणार असल्याचे सुचवित एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्तांनी बालवाडीचे वर्ग बंद करून अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. या प्रस्तावाला मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळविली होती, हे येथे उल्लेखनीय.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका