शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतरच कर्जमाफीचा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:51 IST

अकोला :  कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणी  संपता संपत नाहीत. कर्जमाफीचा शेतकर्‍यांना दसर्‍याच्या आधी  लाभ देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने संपूर्ण विदर्भात आंदोलन  केले, तर कर्जमाफीचा लाभ हा दिवाळीपूर्वी देऊ, असे भाजपाने  जाहीर  केले. मात्र, या दोन्ही पक्षांनी जाहीर केलेला मुहरूत टळला  आहे, त्यातच आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेची  भर पडल्याने  दिवाळीच्या पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्याची  शक्यता मावळली आहे. 

ठळक मुद्देनिवडणुकीचा कोलदांडा सरकारने जाहीर केलेला मुहरूत टळला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणी  संपता संपत नाहीत. कर्जमाफीचा शेतकर्‍यांना दसर्‍याच्या आधी  लाभ देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने संपूर्ण विदर्भात आंदोलन  केले, तर कर्जमाफीचा लाभ हा दिवाळीपूर्वी देऊ, असे भाजपाने  जाहीर  केले. मात्र, या दोन्ही पक्षांनी जाहीर केलेला मुहरूत टळला  आहे, त्यातच आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेची  भर पडल्याने  दिवाळीच्या पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्याची  शक्यता मावळली आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकर्‍यांकडून  ‘आपले सरकार’ पोर्टलवर जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांमार्फ त ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत; परंतु ऑनलाइन  अर्ज भरताना आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित  (लिंक) नसलेल्या शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यासाठी ‘बायोमेट्रिक  मशीन’ उपलब्धतेपासून, तर कनेक्टिव्हिटीपर्यंतच्या अडचणी  उभ्या ठाकल्या. मशीन उपलब्ध झाल्यानंतर आधार कार्ड  नोंदणीच्या वेळी घेण्यात आलेल्या अनेक शेतकर्‍यांच्या  बोटांच्या ठशांचे ‘मॅचिंग’ ऑनलाइन अर्ज अपलोड करताना   झाले नाही. त्यामुळे आधार कार्ड क्रमांक अपडेट करण्यासाठी  शेतकर्‍यांच्या मोठय़ा प्रमाणात रांगा आधार केंद्रावर लागल्या. हा  सर्व गोंधळ निस्तारण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून  दिल्याने प्रत्यक्ष कर्जमाफीची अंमलबजावणी पुढे सरकली होती  व आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी भरलेल्या अर्जांचे चावडी  वाचन थांबविण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी ही दिवाळीनं तरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यां पासून सुरू असलेले कर्जमाफीचे गुर्‍हाळ हे आणखी दोन महिने  लांबण्याची शक्यता आहे.