शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीमध्ये विदर्भात केवळ ८३४ जागाच रिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:48 IST

अकोला: शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भात जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शाळांमध्ये सर्वात कमी रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. विदर्भात केवळ ८३४ जागा रिक्त आहेत.

- नितीन गव्हाळे

अकोला: शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भात जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शाळांमध्ये सर्वात कमी रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. विदर्भात केवळ ८३४ जागा रिक्त आहेत. त्यातुलनेत उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण भागात शिक्षकांच्या सर्वाधिक ९ हजार ४३२ जागा रिक्त आहेत. या जागा पसंतीक्रम व जात संवर्गनिहाय निवडण्याची संधी उमेदवारांना मिळणार असली तरी विदर्भातील हजारो उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.राज्यातील शाळांमधील रिक्त दहा हजार पदांवर शिक्षक भरती होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शिक्षण संस्थांनी जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध केल्या. या सर्वात जास्त रिक्त पदांच्या जाहिराती या उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण भागातील आहेत. विदर्भात अकराही जिल्ह्यांमध्ये त्या तुलनेत फारच नगण्य आहेत. शिक्षक भरतीच्या सर्व जागांसाठी शिक्षकांना अर्ज करता येत असले तरी, विदर्भातील बेरोजगार शिक्षकांना उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण भागातील शाळांमधील रिक्त पदांवर संधी मिळेल का? याविषयी शंका आहे. विदर्भात जागा कमी असल्यामुळे या भागातील शिक्षकांना उर्वरित महाराष्ट्रातील जागांसाठी आॅनलाइन अर्ज व नोंदणी करावी लागणार आहे; परंतु उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षण संस्था वैदर्भीय उमेदवारांना संधी उपलब्ध करून देतील का, याविषयी उमेदवारांना संभ्रम आहे. शिक्षक भरतीमध्ये विदर्भाच्या तुलनेमध्ये उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवारांनाच अधिक संधी मिळणार असल्याने, वैदर्भीय शिक्षक उमेदवारांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

विदर्भातील         रिक्त जागाअकोला-                  ५८अमरावती                ३३भंडारा-                    ९४बुलडाणा-               २६८चंद्रपूर-                     ४0गडचिरोली-             १0५गोंदिया-                   ८९वाशिम-                   ३३यवतमाळ-              ११४शिक्षक भरती ही संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आहे. भरतीमध्ये कोणताही दुजाभाव होणार नाही. केवळ गुणवत्तेच्या आधारेच उमेदवारांची निवड होणार आहे. ज्याच्याकडे गुणवत्ता. त्यालाच संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी काळजी करू नये.-विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त,महाराष्ट्र राज्य.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Recruitmentशिक्षकभरती