शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
2
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
3
"मी काय मूर्ख नाही, भाजपचं मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
4
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
5
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा
6
निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?
7
“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका
8
प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न
9
डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले
10
UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर
11
तेरी गली में आया भूल के...! Ananya Pandey चा KKR च्या शिलेदारांसोबत डान्स, VIDEO
12
"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले
13
“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत
14
Video - ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतची झाली वाईट अवस्था; चालणंही झालं अवघड
15
प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली
16
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
17
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
18
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
19
मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं
20
'एलआयसी'ची मोठी तयारी! आता LIC देणार हेल्थ इन्शुरन्स; कंपनीने दिले संकेत

आॅनलाइन बदल्या : खोटी माहिती देणाऱ्यांची वेतनवाढ रोखणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 2:48 PM

अकोला : जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांतून सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.

ठळक मुद्देशिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या शासन स्तरावरून आॅनलाइन करण्यात आल्या.अनेक शिक्षकांनी सोयीच्या शाळेवर बदली मिळण्यासाठी आरोग्यविषयक समस्यांची खोटी कागदपत्रे जोडली. शासनाने सोयीच्या शाळा मिळवणाºया शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तातडीने पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

अकोला : जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांतून सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. त्यासाठी अशी कागदपत्रे सादर करणाºया शिक्षकांच्या माहितीची पडताळणी करा, खोटी माहिती सादर करणाºया शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्यासोबतच त्यांच्यामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांनाच त्याठिकाणी पदस्थापना देण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने २८ जून रोजी दिला आहे.शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या शासन स्तरावरून आॅनलाइन करण्यात आल्या. त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत मोठे घोळ झाले. विशेष म्हणजे, अनेक शिक्षकांनी सोयीच्या शाळेवर बदली मिळण्यासाठी आरोग्यविषयक समस्यांची खोटी कागदपत्रे जोडली. त्यातून त्यांना सोयीची शाळा मिळाली. तर काहींनी अंतर, पती-पत्नी एकत्रीकरण, पाल्याचे आजारपण या बाबीही नोंद केल्या. त्याचा फायदा त्यांना मिळाला. त्याचवेळी पात्र शिक्षकांवर अन्याय झाला. त्यामुळे शिक्षकांनी केलेल्या दाव्यातील खरेपणा तपासून त्यांच्यावर कारवाईची मागणी पुढे आली. त्यावर शासनाने सोयीच्या शाळा मिळवणाºया शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तातडीने पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संवर्ग २ अंतर्गत ३० किमीपेक्षा जास्त अंतर नसलेल्या शिक्षकांची तसेच संवर्ग १ ची कोणतीही तपासणी न करताच पदस्थापना देणे, सेवाज्येष्ठ शिक्षकांनी मागितलेली गावे कनिष्ठ शिक्षकांना देण्यात आली. संवर्ग चार, संवर्ग दोनमधून अर्ज केलेल्या शिक्षिकांना ३० किमीपेक्षा जास्त अंतराची गावे मागणी केल्यानुसार कशी देण्यात आली, त्यांना ३० किमीच्या आत देणे आवश्यक होते. नियुक्ती दिनांक सारखाच असतानाही काहींना खो देण्यात आला. विविध मुद्द्यांनुसार कारवाई  विशेष संवर्ग भाग-१, विशेष संवर्ग भाग-२ नुसार सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेणाºयांच्या माहितीची पडताळणी १० जुलैपर्यंत करण्याचे शासनाने बजावले आहे. त्यामध्ये दोषी आढळलेल्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई केली जाईल. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बदली झालेल्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा पदस्थापना देतील. त्याचवेळी विस्थापित झालेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ जागी पदस्थापना दिली जाणार आहे. ही कार्यवाही २० जुलैपर्यंत करावी लागणार आहे. विस्थापित शिक्षकांना विनंतीनुसार बदली मिळाली असल्यास खोट्या कागदपत्रांच्या आधारे बदली करून घेतलेल्या शिक्षकांना पुढील वर्षी थेट बदली प्रक्रियेत समाविष्ट केले जाईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद