शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात सुरू झाले जीएसटीचे ऑनलाइन प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 13:53 IST

१५ जूनपर्यंत नोंदणी : विक्रीकर उपायुक्त यांचे आवाहन

१५ जूनपर्यंत नोंदणी : विक्रीकर उपायुक्त यांचे आवाहनअकोला : आगामी १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होत असून, विक्रीकर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडून त्यासाठी विविध मोहीम राबविली जात आहे. शासनाच्या निर्देशान्वये जीएसटीचे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सुरू झाले असून, त्याला व्यापारी आणि उद्योजकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अकोल्यातील व्यापारी आणि उद्योजकांनी येत्या १५ जूनपर्यंत ऑनलाइन प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, असे आवाहन अकोला विभागाचे विक्रीकर उपायुक्त सुरेश शेंडगे यांनी केले आहे.अकोला जिल्हय़ात व्हॅट भरणार्‍यांची संख्या जवळपास आठ हजारांच्या घरात आहे. देशभरात लागू झालेल्या जीएसटीनंतर व्हॅट भरणार्‍यांना जीएसटीची नोंदणी करणे गरजेचे झाले आहे. विक्रीकर विभागातर्फे या नोंदणीतील व्यापारी-उद्योजकांना नोंदणी करण्याच्या सूचना दिल्यात. दरम्यान, शासनाने केंद्राच्या उत्पादन शुल्क आणि विक्रीकर विभागात १ जून ते १५ जूनपर्यंत ऑनलाइन प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी अकोलेकरांकडून त्यास प्रतिसाद मिळाल्याचे समजते. २0 लाख रुपयांच्या आत ज्यांचा व्यवसाय-उद्योग आहे, त्यांना जीएसटीच्या नोंदणीची आवश्यकता नाही; मात्र त्यापलीकडे व्यवसाय गेलेल्या व्यापारी आणि उद्योजकांनी मात्र ही नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या करदात्यांना जीएसटीचा प्रोव्हिजनल आयडी आणि पासवर्ड मिळाला आहे, त्यांनी तातडीने नामांकन करणे गरजेचे आहे. करदात्यांकडून नामांकन अर्ज पूर्णपणे भरणे गरजेचे आहे. त्यानंतर डीएससीई टोकनच्या माध्यमातून जमा करावा लागेल. त्याकरिता अकोल्यातील उद्योजक-व्यापार्‍यांनी १५ जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही विक्रीकर उपायुक्त शेंडगे यांनी केले आहे.