शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीसाठीही ऑनलाइन नोंदणी अनिवार्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:38 IST

अकोला : डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टासाठी शासन आता सर्वच प्रक्रिया आनलाइन करीत आहे. पीक विमा, कर्जमाफी, उडीद, मूग खरेदीनंतर आता कापूस खरेदीसुद्धा ऑनलाइन करण्याचा पवित्रा सरकारने घेतला आहे. 

ठळक मुद्देआजपासून खरेदीपीक विमा, कर्जमाफी, धान्य खरेदीही ऑनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टासाठी शासन आता सर्वच प्रक्रिया आनलाइन करीत आहे. पीक विमा, कर्जमाफी, उडीद, मूग खरेदीनंतर आता कापूस खरेदीसुद्धा ऑनलाइन करण्याचा पवित्रा सरकारने घेतला आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय)ची अभिकर्ता म्हणून राज्य सहकारी पणन महासंघाद्वारा २५ ऑक्टोबरपासून कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. अकोला व तेल्हारा तसेच वाशिममध्ये मानोरा आणि कारंजा व बुलडाण्यात तीन केंद्रांवर खरेदी करणार आहे. सोमवारी यासंदर्भात सीसीआयसोबत पणन महासंघाचा करार झाला आहे; मात्र राज्य सरकारने पणन महासंघाला खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याने २५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार आहे.  दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कापसाच्या वाणानुसार हमीभाव निश्‍चित करण्यात आलेला आहे. यामध्ये बन्नी व ब्रह्म या जातीला ४ हजार २२0 रुपये प्रतिक्विंटल, तर एच-४, एच-६ ला ४ हजार २२0 व एलआरए ५१६६ या जातीला ४ हजार १२0 रुपये हमीभाव राहणार आहे. सद्यस्थितीत प्रतवारीनुसार कापसाला चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा भाव खुल्या बाजारात मिळत आहे. यंदाच्या हंगामात पेरणीपासून पावसाची तूट असल्यामुळे कपाशीची पेरणी उशिरा झाली असून, आधीच त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांना आता कापसाच्या विक्रीपूर्व बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी सात-बारा उतारा, बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. त्याशिवाय शेतकर्‍यांच्या कापसाची खरेदी होणार नाही. यापूर्वी शेतकर्‍यांना केवळ सात-बारा द्यावा लागत होता; परंतु आता ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

पणन महासंघाच्यावतीने राज्यात ६0 केंद्रांवर खरेदीची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार बुधवारपासून कापूस खरेदी करण्यात येईल. खरेदीसंदर्भातील तयारी महासंघाने केली आहे. कापसाच्या भाववाढीबाबत शेतकर्‍यांना अपेक्षा आहेत. शेजारच्या गुजरात राज्यात कापसाला ५00 रुपये बोनस जाहीर करण्यात आला. त्यामुळे आपल्याही राज्यात किमान एक हजार रुपये बोनस सरकारने दिला पाहिजे, ही शेतकर्‍यांची भावना असून, ती सरकारपर्यंत निश्‍चितच पोहोचवणार.- प्रसेनजित पाटील,  उपाध्यक्ष, पणन महासंघ, मुंबई.

टॅग्स :agricultureशेती