शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘ऑनलाइन’ खरेदी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:27 IST

अकोला : विविध कंपन्यांनी ऑनलाइन महासेलमध्ये थेट ग्राहकांना सवलती दिल्याने आता ग्राहक ऑनलाईन खरेदीकडेही  वळला आहे. अकोलासारख्या सेंटरवरून दररोज लाखो रुपयांची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन खरेदीेचा टक्का वाढल्याची नोंद कुरिअर संचालकांच्या व्यवहारामुळे होत आहे.

ठळक मुद्देअकोल्यातूनही होतेय दररोज लक्षावधींची खरेदी१५ कुरिअर कंपनी अकोल्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विविध कंपन्यांनी ऑनलाइन महासेलमध्ये थेट ग्राहकांना सवलती दिल्याने आता ग्राहक ऑनलाईन खरेदीकडेही  वळला आहे. अकोलासारख्या सेंटरवरून दररोज लाखो रुपयांची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन खरेदीेचा टक्का वाढल्याची नोंद कुरिअर संचालकांच्या व्यवहारामुळे होत आहे.गेल्या आठवडयात ऑनलाईन खेरदीसाठी कंपन्यांनी  महासेल चालवले. यामध्ये  मोबाइल आणि एक्सेसरीजमध्ये विविध नामांकित कंपन्यांनी थेट ५0 टक्क्यांपर्यंत सवलती दिल्यात. सोबतच फॅशन आणि ब्युटी संबंधित साहित्यावर तर ७0 टक्के सवलत दिल्या गेल्याने ग्राहक वर्ग मोठय़ा प्रमाणात ऑनलाइन खरेदीकडे वळला आहे. अकोल्याच्या मुख्य बाजारपेठेत नामांकित कंपनीचे शो रूम थाटून बसलेल्या दुकानदारांकडेही खरेदीसाठी येणारा ग्राहक आता ऑनलाईनवर ही किंमत आहे, त्यापेक्षा स्वस्त आपण देऊ शकता का, असा प्रश्न ग्राहकाकडून केला जात आहे.  नामांकित कंपनीच्या डिलरने याबाबतची माहितीदेखील कळविली आहे. त्यामुळे महासेलपेक्षा अधिकची मार्जिन भविष्यात शो रूम संचालकांना मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाइन खरेदीत मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, एलईडी टीव्ही, होम थियेटर, गृहसजावटीच्या वस्तू, लेडीज, जेन्टस, लहान मुलांचे रेडिमेड कपडे आदी खरेदीसाठी ग्राहक वळल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्या आवडी-निवडी सोबतच वस्तूंच्या किमतीत फसवणूक होण्याची भीती यामध्ये नसल्याने ऑनलाइन खरेदीचा कल वाढत जात आहे. त्यामुळे भविष्यात मॉलमधील गुंतवणूकही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

१५ कुरिअर कंपनी अकोल्यात*कुरिअरच्या १५ नामांकित कंपनीचे कार्यालय अकोल्यात असून, त्या माध्यमातून ग्राहकांना सेवा दिली जात आहे. देशातील कानाकोपर्‍यातून आणि विदेशातून वस्तू विमानमार्गे नागपूर कार्यालयात येतात आणि तेथून अकोल्यात ही सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे ऑनलाइन सेवेमुळे अनेक युवकांना काम मिळाले आहे. सोबतच ऑनलाइन खरेदीमुळे अकोल्यातील नेट बँकिंग व्यवहारात वाढ झाली आहे.

युवा वर्गाचा कल अधिकऑनलाइन खरेदी करणार्‍यांमध्ये युवक-युवतींचे प्रमाण अधिक आहे. संगणक साक्षर असलेले आणि नेट बॅकिंगचे व्यवहार समजणार्‍या प्रौढांची संख्या कमी आहे. त्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. त्यामुळे युवा वर्गासाठी लागणार्‍या वस्तूदेखील ऑनलाइन जास्त आहेत.