शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्ससाठी आता ऑनलाइन परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:30 IST

बाभूळगाव जहा. : लर्निंग लायसन्ससाठी आता ऑनलाइन परीक्षा होणार असून, चालकांना फॉर्म भरणे, ‘फी’चा भरणा घरबसल्या करता येणार आहे. या परीक्षेमुळे मात्र अशिक्षितांची गोची होणार आहे. 

ठळक मुद्दे९ ऑगस्टपासून सुरू होईल अंमलबजावणीअशिक्षितांची होणार गोची

आगाखान पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव जहा. : लर्निंग लायसन्ससाठी आता ऑनलाइन परीक्षा होणार असून, चालकांना फॉर्म भरणे, ‘फी’चा भरणा घरबसल्या करता येणार आहे. या परीक्षेमुळे मात्र अशिक्षितांची गोची होणार आहे.  आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात येणारे लर्निंग लायसन्स ९ ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. लर्निंग लायसन्स मिळण्याकरिता उमेदवाराला ऑनलाइन अपॉइंटमेंटसोबतच ऑनलाइन संगणक परीक्षाही द्यावी लागणार आहे. आरटीओच्या शिकस्त इमारतमध्ये ऑनलाइनचा हा खेळ येत्या ९ ऑगस्टपासून रंगणार आहे. ऑनलाइन परीक्षासाठी आरटीओ कार्यालयात एका कक्षेत नऊ संगणक बसविण्यात आले आहेत. ऑनलाइन परीक्षा १५ गुणांची राहणार असून, या परीक्षेत नऊ गुण (६0 टक्के) घेणे अनिवार्य आहे. ही ऑनलाइन परीक्षा अशिक्षितांसाठी कठीण ठरणार आहे. शासनाच्या ऑनलाइन परीक्षेचा फटका गोरगरीब लोकांना बसण्याची शक्यता आहे. शासनाच्या या पारदर्शक कारभारात सर्वसामान्यांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. 

दंडाच्या रकमेत मोठी वाढमोटार अधिनियमात बदल करण्यात आल्याने दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. अशातच ऑनलाइन पद्धतीने लर्निंग लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना नेहमीप्रमाणे आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतील, यात तिळमात्र शंका नाही. 

शिकस्त इमारतीत केली उधळण  आरटीओ कार्यालय रेल्वे स्टेशनजवळील महापालिकेच्या शिकस्त शाळेत आहे. या इमारतीची अवस्था दयनीय आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी या शिकस्त इमारतीत जीव मुठीत घेऊन शासकीय योजना व नियमांची अंमलबजावणी करताना दिसतात; मात्र भाड्याच्या शिकस्त इमारतीमध्ये ऑनलाइन परीक्षांसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. संगणक बसविलेल्या कक्षाची दुरवस्था झालेली आहे. खिडक्या तुटलेल्या आहेत. 

सारथी ४.0 ही संगणकीय ऑनलाइन परीक्षा उपप्रादेशिक कार्यालयात सुरू होत आहे. या सेवेमुळे उमेदवाराला ऑनलाइन परीक्षा देऊन पास व नापासचा निकाल कळणार आहे. १५ प्रश्नांपैकी नऊ प्रश्नांची उत्तरे देणे अनिवार्य राहणार आहे. या सेवेचा अर्जदार फॉर्म भरण्यासाठी घरबसल्या लाभ घेऊ शकेल. परीक्षा मात्र त्यांना संगणकावर द्यावी लागणार आहे. त्यासाठी सात मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. - अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.