शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षण अन् मोबाईलने लावला मुलांना चष्मा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

कोरोनामुळे शाळा बंदच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे स्क्रीन ...

कोरोनामुळे शाळा बंदच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे स्क्रीन टाईम वाढला आहे. ऑनलाईन शिक्षण संपले की मुले मोबाईलवर खिळून राहतात. त्याचे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर दुष्परिणाम होत आहेत. तासन्‌ तास मोबाईल, संगणकासमोर बसल्याने विद्यार्थ्यांना डोळेदुखीचा त्रास जाणवतो.

लहान मुलांमध्येही डोकेदुखी वाढली

सतत मोबाईल, संगणक वापरल्याने लहान मुलांना डोकेदुखीचा आजार जडत आहे. डोकेदुखी वाढत असल्याने मुलांमध्ये एकाग्रता राहत नाही.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक सूर्यप्रकाश खूप आवश्यक असतो. जास्त वेळ ऑनलाईन स्क्रीनसमोर असेल तर मुलांच्या चष्म्याचा नंबर वाढू शकतो.

प्रत्येक २० मिनिटांनंतर २० फूट दूर ठेवलेल्या वस्तूकडे २० सेकंदासाठी पाहावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. पर्यायाने डोकेदुखीचा त्रास कमी होईल.

लहान मुलांना हे धोके...

सतत मोबाईल आणि संगणक वापरल्याने डोळे, मेंदूवर ताण पडतो. त्यामुळे साहजिकच डोकेदुखीचा त्रास जाणवतो.

चिडचिडही वाढू शकते. मेंदूवर जास्त ताण आल्यास अभ्यासात मन लागत नाही. एकाग्रता राहत नाही.

डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून...

संगणक स्क्रीनवर अ‍ँटिग्लेयर ग्लास बसवावी

पुस्तक/संगणक उजेडात असावा

जास्तीत जास्त फळांचे सेवन करा

अ‍ँटिग्लेयर चष्मा वापरावा

प्रत्येक तासिकेनंतर डोळे बंद ठेवून थोडा आराम द्यावा

पुस्तक १२ ते १५ इंच लांब धरावे

पालकही चिंतेत

कोरोनामुळे शाळा बंदच आहेत. यामुळे ऑनलाईन शिक्षण व्यवस्था अंमलात आली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जात असला तरी, मुलांना मोबाईलचे व्यसन जडत असल्याचे दिसून येते. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले अधिकाधिक वेळ संगणक व मोबाईलसमोर असतात. यामुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहेत.

- सुनील किर्तने, पालक

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जात आहे, ही बाब चांगलीच आहे. परंतु, ऑनलाईन क्लास संपल्यानंतर मुले जास्त प्रमाणात मोबाईल, संगणक, टॅबचा वापर करतात. यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मुलांना डोळे व डोकेदुखीचा तसेच मानदुखीचा त्रासही जाणवतो.

- प्रशांत देशमुख, पालक

संगणक आणि मोबाईलच्या अति वापरामुळे मुलांमध्ये डोळेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे असे प्रकार वाढत आहेत. जास्त वेळेसाठी मोबाईल, लॅपटाॅपवर लक्ष केंद्रित केल्यामुळे डोळ्यांना थकवा येणे, डोळे कोरडे पडणे व त्यामुळे डोळ्यांना खाज येणे, लाल होणे, डोळे दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. ऑनलाईन ‘स्क्रीन टाईम’ जास्त असेल तर डोळ्याला त्रास जाणवू लागतो. डोळ्यांवर ताण येत असल्याने डोकेदुखीचा त्रासही जाणवतो.

- डॉ. राजेश पवार, नेत्रतज्ज्ञ, जीएमसी, अकोला