शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार थकबाकीदारांचे ‘ऑनलाइन’ अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:03 IST

अकोला : शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यामध्ये १८ ऑगस्टपर्यंत गत २५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ ७ हजार ८७0 थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यामध्ये १८ ऑगस्टपर्यंत गत २५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ ७ हजार ८७0 थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात आले.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार राज्यातील शेतकर्‍यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुर्नगठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यासाठी, संबंधित शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर गत २४ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.  कर्जमाफी योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेत १८ ऑगस्टपर्यंत गत २५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ ७ हजार ८७0 थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्यात आले आहेत.

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर आतापर्यंंत  ७ हजार ८७0 थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर (वेबसाइट) भरून घेण्यात आले.- सागर भुतडा, जिल्हा समन्वयक, महाऑनलाइन