शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ात ९0 हजारांवर शेतकर्‍यांनी भरले ऑनलाइन अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:26 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम सुरू असून, मंगळवारी सायंकाळ पर्यंत जिल्हय़ात ९0 हजार ७0२ थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्यात आले. उर्वरित ७२ हजार २९८ शे तकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम अद्याप बाकी आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी ७२ हजार शेतकर्‍यांचे अर्ज बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम सुरू असून, मंगळवारी सायंकाळ पर्यंत जिल्हय़ात ९0 हजार ७0२ थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्यात आले. उर्वरित ७२ हजार २९८ शे तकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम अद्याप बाकी आहे. सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शे तकर्‍यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत  कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या  शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे  पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्या त येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’  अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याचे  काम  गत २४ जुलैपासून जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक  सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू  केंद्रांवर सुरू करण्यात आले आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंंत असून, या मुदतीत  कर्जमाफीसाठी जिल्हय़ातील पात्र १ लाख ६३ हजार थकबाकीदार  शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ५ स प्टेंबर रोजी सायंकाळपर्यंंत जिल्हय़ात ९0 हजार ७0२ शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्यात आले असून, उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्हय़ा तील ७२ हजार २९८ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम  अद्याप बाकी आहे. 

अर्ज भरण्याचे काम तातडीने पूर्ण करा; अपर जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  भरण्याच्या कामाचा आढावा संनियंत्रण समितीच्या बैठकीत मंगळवारी  अपर जिल्हाधिकारी राजेंद्र खवले यांनी घेतला. कर्जमाफी योजनेत शे तकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे  निर्देश अपर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील सेतू केंद्र संचालकांना  यावेळी दिले. या बैठकीला समितीचे सदस्य जिल्हा पुरवठा अधिकारी  संतोष शिंदे, नायब तहसीलदार राजेंद्र इंगळे व संबंधित अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.