शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्ज आता ऑनलाईन प्रणालीद्वारे!

By admin | Updated: January 14, 2017 00:43 IST

अकोला मनपा निवडणूक; ऑनलाईन अर्ज सादर करताना उडणार उमेदवारांची उडणार धांदल.

अकोला, दि. १३- महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर (संकेतस्थळ) ऑनलाईन प्रणालीद्वारे इच्छूकांना उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना उमेदवारांची धांदल उडणार असल्याचे निश्‍चीत मानल्या जात आहे. काळ्य़ा पैशांना आळा बसण्यासह कर चोरीला लगाम लावण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांसाठी ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निश्‍चीतच पहिल्यांदाच ही प्रक्रिया होत असल्याने इच्छूकांची धांदल,गोंधळ उडणार हे मानल्या जात आहे. ऑनलाईन अर्जामध्ये इच्छूक उमेदवारांनी इत्थंभूत माहिती सादर केल्यानंतर त्याची निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट)नोंद होईल. नोंद झाल्यानंतर सादर केलेल्या अर्जाची प्रत मनपा निवडणुकीची जबाबदारी सोपवलेल्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सोपवावी लागेल. त्यावेळी अर्जाच्या प्रतीसोबत शपथपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याची माहिती आहे. काळजीपूर्वक भरा; दुरुस्ती होईल!इच्छूक उमेदवारांपैकी अनेकांचा संगणक, इंटरनेट वापराशी संबंध आला नसेल तर त्यांची काही अंशी धांदल उडेल, यात दुमत नाही. संगणक,इंटरनेट वापराचे ज्ञान असणार्‍या व्यक्तीकडूनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून घ्यावा. निवडणुकीचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरताना त्यामध्ये काही चूका होऊन अर्जाची नोंद झाल्यास उमेदवारांनी घाबरण्याचे कारण नाही. त्या वेबसाईटवर जाऊन पुन्हा अर्जातील त्रुट्या दुर करता येतील. त्यासाठी संबंधित उमेदरावाला विशिष्ट क्रमांक दिला जाईल. १५ अधिकार्‍यांची चमू होणार कार्यरतनिवडणूक लढविणार्‍या इच्छूक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे,त्यातील त्रुट्या दुर करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसह १५ अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये पाच निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्या दिमतीला प्रत्येकी दोन शासकीय अधिकार्‍यांची नेमणुक केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे आदेश उद्या शनिवारी किंवा सोमवारी प्राप्त होतील.