शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला एप्रिलमध्ये मिळेल १६00 रुपये प्रतिक्विंटल भाव!

By admin | Updated: March 18, 2015 01:23 IST

केंद्रीय कृषी विपणन संशोधन विभागाचा अंदाज.

अकोला : येणार्‍या एप्रिल महिन्यात कांद्याची सरासरी किंमत पंधराशे ते सोळाशे रुपये प्रतिक्विंटल राहणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी विभाग व केंद्रीय कृषी विपणन केंद्राने वर्तविला आहे. यावर्षी रब्बी कांद्याचे क्षेत्र २0 टक्क्यांनी वाढले असून, मागील वर्षापेक्षा उत्पादनदेखील वाढण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांदा विक्री व साठवणीसंदर्भात योग्य निर्णय या माहितीमुळे घेता येईल.देशात महाराष्ट्र कांदा उत्पादनात अग्रगण्य असून, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, सोलापूर, नागपूर या जिलंमध्ये सर्वाधिक कांद्याचे क्षेत्र आहे. २१0३-१४ मध्ये राज्याचा कांदा उत्पादनातील देशपातळीवरील वाटा ३0 टक्के एवढा आहे. राष्ट्रीय बागायती मंडळाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील कांद्याचे लागवडीखालील क्षेत्र ४.६८ लाख हेक्टर असून, उत्पादन हे ५८.६७ लाख टन झाले आहे. २0१२-१३ मध्ये कांद्याचे क्षेत्र २.६ लाख हेक्टर, तर उत्पादन ४६.६0 लाख टन होते. यावर्षी २0 टक्के लागवड वाढल्याने उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र सांख्यिकी विभाग व नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन केंद्राच्या कृषी विपणन केंद्राच्या (एनसीएपी) चमूने लासलगाव बाजारपेठेतील मागील ११ वर्षांच्या कालावधीतील कांद्याच्या मासिक सरासरी किमतीचे पृथ:करण केले. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, बाजारपेठेतील चालू स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात वेगवेगळ्य़ा प्रतीनुसार कांद्याच्या सरासरी किमती प्रतिक्विंटल पंधराशे ते सोळाशे रुपये राहण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात होणारे बदल आणि हवामानातील बदल यांचा परिणामही किमतीवर होऊ शकतो. यासंदर्भात कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. आर. जी. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी कांदा लागवड २0 टक्क्य़ांनी वाढली असल्याचे सांगीतले. या पृष्ठभूमीवर कांद्याच्या किमतीचे पृथक्करण करण्यात आले असता एप्रिल महिन्यात कांद्याच्या किमती सरासरी प्रतिक्विंटल १५00 ते १६00 रुपये राहण्याचा या अभ्यासाचा निष्कर्ष काढला असल्याचे सांगीतले.