- राजरत्न सिरसाट
अकोला, दि.25 - राज्यात प्रथमच कांद्याचे दर पाच पैसे प्रतिकिलो एवढे घसरले असून, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असताना येत्या नोव्हेेंबरमध्ये मात्र कांद्याला प्रतिक्विंटल ७४० ते ८०० रुपये भाव मिळण्याची शक्यता राष्टÑीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन, कृषी विपणन केंद्राने वर्तविली आहे.
महाराष्टÑ देशात कांदा उत्पादनात अग्रगण्य असून, लागवड क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्टÑाचा उत्पादनाचा वाटा हा २७ टक्के (४५.४६ दशलक्ष टन) एवढा तर क्षेत्र ४.६६ दशलक्ष हेक्टर आहे. महाराष्टÑासह कर्नाटक, गुजरात, बिहार, आंध्रप्रदेश तामिळनाडू, राजस्थान आणि हरियाणा हे महत्त्वाची कांदा उत्पादक राज्ये आहेत. राष्टÑीय बागायती संशोधन व विकास संस्थेच्या माहितीनुसार महाराष्टÑात २०१४-१५ मध्ये ४.६८ दशलक्ष हेक्टर क्षेत्र व उत्पादन ५८.६४ दशलक्ष टन एवढे होते.
कांद्याचे उत्पादन व किमतीचा कल या सर्व बाबींचा विचार करू न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी,अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग तसेच नवी दिल्लीच्या राष्टÑीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन केंद्र (एनआयएपी) कृषी विपनण संशोधन केंद्राच्या चमूने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांदा बाजारपेठेतील मागील १२ वर्षांच्या कालावधीतील मासिक सरासरी किमतीचे पृथ्थकरण केले. या केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार सामान्य हवामात वेगवेगळ््या प्रतिनुसार येणाºया नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या सरासरी किमती ७४० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलच्या जवळपास राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
- कांदा उत्पादनात भारत जगात दुसरा
कांदा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक (१६.८२ टक्के) असून, द्वितीय क्रमांक (२७ टक्के) चीनचा लागतो; परंतु इतर देशाच्या तुलनेत भारताची कांदा उत्पादकता १४२१ टन प्रतिहेक्टर आहे. भारतातील कांद्याला जगात मलेशिया, बांगलादेश, युनायटेड अरब अमिरात, श्रीलंका, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशात खूप मागणी आहे.
- येणाºया नोव्हेंबरमध्ये कांद्याला सरासरी ७४० ते ८०० रू पये प्रतिक्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात जर बदल झाले आणि हवामानात बदल झाला तर या बदलाचा परिणाम कांद्याच्या किमतीवर होेऊ शकतो. ही माहिती शेतकºयांना पीक, पेरणी व निविष्ठा वापराच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात उपयुक्त ठरेल.
- डॉ. राजेंद्र देशमुख,
विभाग प्रमुख,
कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग,
डॉ. पंदेकृवि,अकोला.