शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी मनपात एक खिडकी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:02 IST

विविध प्रकारच्या परवानग्या एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशातून महापालिकेच्या मुख्य सभागृहात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

अकोला : शहरात सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू झाली असून, लहान-मोठ्या गणेश मंडळांकडून मंडप उभारणी केली जात आहे. अशा सर्व मंडळांना विविध प्रकारच्या परवानग्या एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशातून महापालिकेच्या मुख्य सभागृहात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेश भक्तांसाठी १२ सप्टेंबरपर्यंत ही योजना सुरू राहील.शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह लहान-मोठे मंडळ कामाला लागले आहेत. येत्या १३ सप्टेंबर रोजी बच्चे कंपनीपासून ते घरातील आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांचे मोठ्या थाटात आगमन होणार आहे. शहरातील नामवंत गणेश मंडळांकडून भव्यदिव्य गणेश मूर्तींची स्थापना करून आकर्षक मंडप उभारल्या जातात. त्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. मंडप उभारणी, विद्युत रोषणाई तसेच मागील वर्षीचा आर्थिक हिशेब सादर करण्यासाठी लहान-मोठ्या सर्वच मंडळांना मनपासह पोलीस प्रशासन, महावितरण कार्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय आदी शासकीय कार्यालयांच्या पायºया झिजवाव्या लागतात. हा मानसिक त्रास कमी व्हावा, गणेश भक्तांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या रीतसर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या मुख्य सभागृहात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत गणेश मंडळांना अर्ज सादर करता येतील. ही मुदत १२ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे.आज गणेशोत्सव मंडळाची बैठकयंदा शहरात गणेश उत्सवाचे १२५ वे शतकोत्तर रजत जयंती वर्ष साजरे केले जाईल. या पृष्ठभूमीवर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने उद्या बुधवारी दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये मंडळांचे पदाधिकारी, सदस्य व शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. १३ सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला प्रारंभ होणार असून, २३ सप्टेंबर रोजी विसर्जन केले जाईल. त्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत गणेश भक्तांना सूचना मांडण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, कार्याध्यक्ष हरीश आलिमचंदानी, संग्राम गावंडे, महासचिव सिद्धार्थ शर्मा, अ‍ॅड. सुभाषसिंह ठाकूर, विजय जयपिल्ले, विजय तिवारी, मनोज खंडेलवाल आदींनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका