शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus : दिवसभरात एकाचा मृत्यू; १० नवे पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 18:13 IST

२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे ३११ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देदहा नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाला एकूण २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला :अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शुक्रवार, ३ जुलै रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाला. तर दहा नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा ८४ वर गेला असून, एकूण बाधितांची संख्याही १६१७ झाली आहे. दरम्यान, २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे ३११ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात एकूण १८५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १७५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तीन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण पातूर, मोठी उमरी अकोला, पारस, इकबाल नगर बुलडाणा, वाकेकर हॉस्पिटल जळगाव जामोद जि. बुलडाणा(हा रुग्ण ओझोन हॉस्पिटल येथून संदर्भित आहे),  बार्शीटाकळी,  बाळापूर, अडगाव ता. तेल्हारा, मोठी उमरी, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. 

६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यूशुक्रवारी पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण ६५ वर्षीय पुरुष असून, ते शंकरनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना २३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी  पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८४ झाला आहे.

२२ जणांना डिस्चार्जशुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना तर  कोविड केअर सेंटर मधून १७ जणांना  असा एकूण २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. हे रुग्ण लक्कडगंज, संदीप सोसायटी,  दगडी पुल, हैदरपूरा व बाळापूर येथिल रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले. तर आज सायंकाळी कोविड केअर सेंटर मधून १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात चार जण हरिहर पेठ येथिल, चार जण अकोट फैल येथील तर  तीन जण तार फैल, दोन जण भिमनगर, दोन जण गुलजारपुरा तर खडकी व अनिकट पोलीस लाईन येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे. आतापर्यंत १२२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३११  अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशानाने स्पष्ट केले आहे. 

प्राप्त अहवाल-१८५पॉझिटीव्ह अहवाल-१०निगेटीव्ह-१७५

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १६१७मयत-८४ (८३+१)डिस्चार्ज-१२२२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३११

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला