लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आगर येथील एका शेतक-याला त्यांच्या शेतात जाण्यास मज्जाव केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणा-यास प्रथमश्रेणी न्यायालयाने शनिवारी एक महिन्यांची शिक्षा सुनावली.आगर येथील रहिवासी पांडुरंग उदेभान उगले आणि नरेंद्र बोरी यांचे आजूबाजूला शेत आहे. नरेंद्र बोरी हे उगले यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मज्जाव करीत असत, त्यामुळे उगले यांनी सदरप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने उगले यांच्या बाजूने निकाल देत बोरी यांनी उगले यांना शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याचे आदेश दिले; मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही उगले यांना शेतातून जाण्यास विरोध करण्यात येत असल्यामुळे त्यांनी पुन्हा दिवाणी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात नरेंद्र बोरी हे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत असल्याचे सिद्ध झाल्याने शनिवारी प्रथमश्रेणी न्यायालयाने बोरी यांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी उगले यांच्यावतीने अॅड. चंद्रकांत वानखडे यांनी कामकाज पाहिले.
न्यायालयीन आदेशाचा अवमानप्रकरणी एक महिन्याची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:40 IST
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आगर येथील एका शेतक-याला त्यांच्या शेतात जाण्यास मज्जाव केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणा-यास प्रथमश्रेणी न्यायालयाने शनिवारी एक महिन्यांची शिक्षा सुनावली.आगर येथील रहिवासी पांडुरंग उदेभान उगले आणि नरेंद्र बोरी यांचे आजूबाजूला शेत आहे. नरेंद्र बोरी हे उगले यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मज्जाव करीत असत, त्यामुळे उगले यांनी ...
न्यायालयीन आदेशाचा अवमानप्रकरणी एक महिन्याची शिक्षा
ठळक मुद्देपुन्हा दिवाणी न्यायालयात धाव