मंगरूळपीर (वाशिम) : मुंबईवरून नागपूरकडे जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर शेलूबाजारनजीक २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान ट्रेलर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार नागपूरवरून औरंगाबादकडे जाणारा एम.एच.४0 ए.0५0९ क्रमांकाचा ट्रेलर लोखंड घेऊन जात होता. तर एम.एच. २८, ८५७९ क्रमांकाचा ट्रक नागपूरकडे जात होता. सदर ट्रकमध्ये बॅटरी भरलेल्या होत्या. दरम्यान, शेलूबाजारनजीक या ट्रेलर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या ट्रकमधील सर्व बॅटर्या कॅबिवर आदळल्या. सदर बॅटर्यामध्ये दबून ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलरचा चालक व वाहकही ट्रेलच्या कॅबिनमध्ये दबले होते. दरम्यान, त्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी धावपळ करून क्रेन आणली. क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलेल्या चालक व वाहकाला उपचारासाठी तत्काळ अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
शेलूबाजारनजीक ट्रेलर व ट्रकचा अपघातात एक ठार, दोन जखमी
By admin | Updated: December 29, 2014 00:38 IST