शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरुन पडून एक जण ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 18:51 IST

One killed, one injured after falling off bike मंगेश दुर्योधन जामनिक (२३ राहणार पळसो बढे) असे मृतकाचे नाव आहे.

ठळक मुद्दे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो घटनास्थळीच ठार झाला.  रोहन मेश्राम (२२) हा किरकोळ जखमी झाला.

मूर्तिजापूर : तालुक्यातील लाखपूरी येथील पूर्णा नदीच्या पुला जवळ भरधाव दुचाकीवरुन मागच्या मागे पडल्याने एक जण ठार झाला;  तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी ४:३० वाजताच्या दरम्यान घडली. मंगेश दुर्योधन जामनिक (२३ राहणार पळसो बढे) असे मृतकाचे नाव आहे.              अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील पळसो बढे येथील दोन युवक काही कामानिमित्त दर्यापूर येथे गेले होते. एमएच ३० बीई ६४८० या क्रमांकाच्या दुचाकी वरुन परत येताना लाखपूरी येथील पुर्णा नदीच्या पुलाजवळ मंगेश दुर्योधन जामनिक (२३) हा दुचाकीच्या मागे बसला असताना तोल जाऊन मागच्या मागे पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो घटनास्थळीच ठार झाला.  तर या घटनेने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी चालक  रोहन मेश्राम (२२) हा दुचाकी घेऊन रस्त्याच्याकडेला पडल्याने किरकोळ जखमी झाला. दोघांनीही भरपुर मद्यप्राशन केल्याने हा अपघात घडल्याची माहीती आहे. घटनेची माहिती मिळताच येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मृतकाला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात