शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शंभर टक्के पुनर्वसनासाठी जांभावासीयांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:21 IST

तालुक्यातील मंगरुळ कांबे बॅरेजची कामे रखडलेली आहेत. मंजूर झालेल्या बॅरेजेसमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश असून, या ...

तालुक्यातील मंगरुळ कांबे बॅरेजची कामे रखडलेली आहेत. मंजूर झालेल्या बॅरेजेसमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश असून, या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला असल्याने गावाचे १०० टक्के पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत विविध आंदोलनासह आत्मदहनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला.

गाव १०० टक्के बाधित असल्याने तसा अहवाल कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग यांच्यावतीने २ डिसेंबर २०१० रोजी सदर केला व गाव शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यातच पुनर्वसन कलम (११) जाहीर झालेले असल्याने जांभा बुद्रुक गावांमध्ये विकासाची कामे करणेबाबत पूर्ण मनाई करण्यात आलेली आहे. शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही पुनर्वसनासाठी टाळाटाळ करण्यात येऊन गावकऱ्यांना झुलवत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर २०१६ मध्ये सदर गाव अंंशत: बाधित असल्याबाबतचा जावईशोध लावण्यात आला, परंतु शासन जोपर्यंत जाभां बु. गावाचे १०० टक्के पुनर्वसन करीत नाही, तोपर्यंत विविध आंदोलने छेडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी जांभा येथील एक दिवसाचे लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले.

---------

घरे कोसळून अपघाताची शक्यता!

प्रकल्पामुळे गावातील घरे मोडकळीस आलेली असून, ती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.गेल्या ११ वर्षापासून गावकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात येत असल्याने आता गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सद्यस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी गाव १३ टक्के बाधित क्षेत्रात येत आहे, असे सांगून ३५० घरांपैकी ७० घरांंची पुनर्वसन यादी तयार केली आहे. या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी झाले होते.