शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

एकीकडे दंड, दुसरीकडे टॉवर उभारणीला मंजुरी

By admin | Updated: May 29, 2015 02:35 IST

अकोला महापालिकेचे ‘रिलायन्स’ प्रेम; अनधिकृत कामे दंड वसुली करून केली नियमित.

राम देशपांडे / अकोला : शहरात फोर जी सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्सने विहित मुदतीत अपेक्षित काम न केल्याने कंपनीला महापालिकेने एकीकडे ६ कोटी ५४ हजारांचा दंड ठोठावला असून, दुसरीकडे महापालिकेच्या हद्दीत तब्बल १७ टॉवर उभारणीसाठी त्याच कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे परवानी न घेता उभारण्यात आलेल्या टॉवरला दंड वसुली करून नियमितही करण्यात आले. अकोला शहरात फोर जी सेवा सुरू करण्यासाठी खोदकाम करून फायबर ऑप्टिक केबलचे जाळे टाकण्याचे काम मनपाने रिलायन्स कंपनीला दिले होते. रिलायन्स कंपनीला सप्टेंबर २0१४ मध्ये देण्यात आलेल्या या कंत्राटाची मुदत २२ फेब्रुवारी २0१५ रोजी संपली. कंत्राटासाठी ठरलेल्या अवधीत रिलायन्स कंपनीने शहरातील प्रमुख मार्गाच्या कडेला खोदकाम करून किमान पाच फुटांवर फायबर ऑप्टिक केबल्स टाकणे अपेक्षित होते. मात्र, मुदत संपल्यानंतरदेखील तीन महिन्यांचा कालावधी उलटा असला तरी शहरात केबलचे जाळे टाकण्याचे काम रिलायन्स कंपनी पूर्ण करू शकली नाही. ही बाब एवढय़ावर संपुष्टात येत नाही, तर केबल टाकण्यासाठी कंपनीने किमान पाच फूट खोलीवर केबल टाकणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीने त्यातही कामचुकारपणा केला असून, केवळ तीन फुटांवर खोदकाम करू केबल टाकल्या असल्याचे मनपा अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीदरम्यान आढळून आले आहे. परिणास्वरूप महापालिका आयुक्तांनी गुरुवार, २८ मे रोजी रिलायन्स कंपनीला मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्यापोटी प्रतिदिन १0 हजार रुपयांप्रमाणे ३ कोटी ३0 लाख रुपये आणि केबलचे जाळे ५ फुटांवर न टाकता केवळ ३ फुटांवर टाकल्यापोटी ४ कोटी ६९ लाख रुपये दंड बुधवारी ठोठावला आहे. तसेच कंपनीला कामाचा कालावधी ३0 जूनपर्यंत वाढवून दिला असून, त्यानंतरही काम अपूर्ण राहिल्यास प्रतिदिवसाला १ लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. पावसाळय़ापूर्वीच हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, वाढवून दिलेल्या कालावधीत रिलायन्सला दिवस-रात्र काम करून त्याचे व्हिडीओ शुटिंग मनपाकडे सादर करावे लागणार असल्याची माहिती मनपा अधिकार्‍यांनी लोकमतला दिली. मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे मनपा आयुक्तांनी एकीकडे रिलायन्स कंपनीला दंड ठोठावला असला तरी, दुसरीकडे आयुक्तांनी रिलायन्स कंपनीला शहरात तब्बल १७ मोबाइल टॉवर्स उभारण्याची परवानगी दिली असल्याची बाब समोर आली आहे. रिलायन्स कंपनीने शहरात १९ मोबाइल टॉवर्स उभारण्याची परवानगी मनपाकडे मागितली होती. मात्र, परवानगी मागण्यापूर्वीच रिलायन्सने महापालिकेच्या हद्दीत काही मोबाइल टॉवर्सची उभारणी केली होती. ही बाब लक्षात येताच मनपा आयुक्तांनी अनधिकृतरीत्या उभारेल्या टॉवर्सना अधिकृत करीत रिलायन्सला १ लाख २0 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तर महापालिकेच्या हद्दीत तब्बल १७ मोबाइल टॉवर्स उभारण्याची परवानगी देऊन आपले ह्यरिलायन्स प्रेमह्ण व्यक्त केले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शहरात टॉवर उभारणीला प्रथमच परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय सर्वांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभेत घेणे आवश्यक नव्हते का? याबाबत मनपा आयुक्तांना विचारणा केली असता, त्यांनी शासनाने दिलेल्या विशेष अधिकारांचा उपयोग केला असल्याची माहिती दिली. यामुळे शहरात यापुढे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचे वारे घोंगावणार, हे मात्र निश्‍चित.