शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ११ शेतक-यांनी घेतला विषाचा घोट

By admin | Updated: August 17, 2015 01:40 IST

एकाचा मृत्यू, १0 जणांवर उपचार सुरू.

सचिन राऊत / अकोला : अस्मानी व सुलतानी संकटाने घायाळ झालेल्या अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील तब्बल ११ शेतकर्‍यांनी एकाच दिवशी म्हणजे रविवारी विषाचा घोट घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. यामधील एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला असून, उर्वरित १0 शेतकर्‍यांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुबार पेरणी केल्यानंतरही पाऊस न आल्याने प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी सावरत तिबार पेरणी केली. मात्र, या पेरणीनंतर पाऊस प्रचंड प्रमाणात आल्याने अनेक शेतकर्‍यांची पिकं पाण्याखाली गेली. यावर शासनाकडून मदत मिळेल किंवा पीककर्जाचे पुनगर्ठन होईल, या आशेने जगत असलेल्या शेतकर्‍यांना पीककर्ज पुनर्गठनाचा कुठलाही आधार मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, रविवारी एकाच दिवशी ११ शेतकर्‍यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये ८ शेतकरी अकोला जिल्हय़ातील असून, दोन वाशिम तर एक शेतकरी बुलडाणा जिल्हय़ातील आहे. वाशिम जिल्हय़ातील दिनकर नारायणराव भगत (४५) यांचा सवरेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १0 शेतकर्‍यांवर उपचार सुरू असून, त्यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

*या शेतक-यांनी घेतले विष

      गजानन मारोती भिसे (१८) रा. बाळापूर, गजानन दादाराव चौधरी (३५) रा. आकोट, सुनील हिंमतराव गोमासे (३0) रा. बोरगाव मंजू, अ. शफीक अ. रउफ (२0) रा. वाशिम, प्रतिभा नवले (२५) रा. बोरगाव मंजू, गजानन दत्तात्रय कुरडे (२५) रा. महान, मारोती सोनोने (६0) रा. बुलडाणा, मिलिंद राजू भगत (२0) रा. पिंजर, दत्ता रघुनाथ सोळंके (२४) रा. आकोट, मंगेश दिनेश चक्रनारायण (२५) रा. बोरगाव मंजू या शेतकर्‍यांनी विष प्राशन केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर दिनकर नारायण भगत (४५) रा. वाशिम यांचा मृत्यू झाला.