लोकमत न्यूज नेटवर्कवरुर जऊळका- घराच्या स्लॅबवरुन कोसळल्याने खापरवाडी खुर्द येथील गोपाल रामभाऊ अवारे (५५) यांचा १३ ऑगस्टच्या मध्यरात्री मृत्यू झाला. खापरावडी येथील गोपाल रामभाऊ अवारे हे नेहमीप्रमाणे शेजारच्या इमारतीच्या स्लॅबवर झोपण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी गेले होते. मध्यरात्री अचानक पाऊस आल्याने इमारतीवरुन खाली येण्याचे प्रयत्नात त्यांचा स्लॅबवरुन पाय घसरला व ते खाली पडले. खाली पडल्यानंतर नागरिकांना आवाज आला. शेजारी राहणार्या लोकांनी घटनास्थळावर धाव घेतली असता त्यांना अवारे हे खाली कोसळलेले आढळले.त्यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला होता. याविषयी पोलीस पाटील सुनिल अवारे यांनी पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर अकोट पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी अकोटला हलविले. त्यांच्या मागे तीन भाऊ, दोन बहिनी असा आप्त परिवार आहे.
घरावरून पडल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 20:11 IST
वरुर जऊळका- घराच्या स्लॅबवरुन कोसळल्याने खापरवाडी खुर्द येथील गोपाल रामभाऊ अवारे (५५) यांचा १३ ऑगस्टच्या मध्यरात्री मृत्यू झाला.
घरावरून पडल्याने एकाचा मृत्यू
ठळक मुद्देखापरवाडी खुर्द येथील घटनाअचानक पाऊस आल्याने स्लॅबवरुन पाय घसरला