शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

दीड हजार चिमुकल्यांनी गिरविले शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 16:04 IST

दीड हजार चिमुकल्यांनी शाडू मातीचे गणराय साकारून पर्यावरण रक्षणसाठी केलेला संकल्प पाहून उपस्थितही भारावले.

ठळक मुद्दे रविवारी शाडू मातीद्वारे श्री गणेश मूर्ती निर्माण नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध शाळांमधील तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

अकोला : लहान मुले एकत्र आली की गोंगाट अन् किलबिलाट सुरू होतो. मात्र, रविवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात दीड हजार विद्यार्थी एकत्र येऊनही कुठलाही किलबिलाट नव्हता, प्रत्येक जण आपल्यासमोरील मातीला आकार देण्यामध्ये एवढा गुंग होता की तब्बल चार तास कसे गेले ते कळलेच नाही. दीड हजार चिमुकल्यांनी शाडू मातीचे गणराय साकारून पर्यावरण रक्षणसाठी केलेला संकल्प पाहून उपस्थितही भारावले.अखिल भारतीय क्षत्रिय महासभा अकोला जिल्ह्याच्यावतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने रविवारी शाडू मातीद्वारे श्री गणेश मूर्ती निर्माण नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध शाळांमधील तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरणप्रेमी शरद कोकाटे यांनी श्री गणेश मूर्ती बनविण्याची कला विद्यार्थ्यांना शिकविली. यावेळी गणपती मूर्ती बनवून घरी त्याच मूर्तीची स्थापना करण्याची शपथ घेतली.या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अ. भा. क्षत्रिय महासभेचे राष्टÑीय उपाध्यक्ष राजेंद्रसिंह चौहान, अ. भा. क्षत्रिय महासभेचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष अजयसिंह सेंगर आ. गोपीकिसन बाजोरिया, आ. विप्लव बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उप विभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील, डॉ. गजानन नारे, रामप्रकाश मिश्रा, रोहितसिंग परदेसी, मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यशाळेला अ.भा. क्षत्रिय महासभेचे प्रदेशाध्यक्ष अजयसिंह सेंगर, युवा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष मनोजसिंह बिसेन, विदेश प्रदेशप्रमुख विनोदसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत, प्रकल्पप्रमुख नवीनसिंह ठाकूर, आशिषसिंह ठाकूर, सारिका चौहान, महासचिव संजयसिंह बैस, राजेशसिंह चौहान यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उदयसिंह ठाकूर, अजयसिंह गौर, श्यामसिंह ठाकूर, विजयसिंह गहिलोत, डॉ. गजेंद्रसिंह रघुवंशी, डॉ. संजयसिंह परिहार, डॉ. अजयसिंह चौहान, संजयसिंह ठाकूर, रमण पाटील, प्रदीपसिंह चंदेल, संजयसिंह संदेल, मनीषसिंह बिसेन, दिलीपसिंह बिसेन, रवी ठाकूर, युवा कार्यकारिणीचे सूरजसिंह ठाकूर, राजकमलसिंह चौहान, नवज्योतसिंह बघेल, अर्जुनसिंह गहिलोत, राकेशसिंह बैस, सौरभ चौहान, गौरव चौहान, दिनेश ठाकूर, संदीप ठाकूर, नीलेश ठाकूर, सूरज ठाकूर, गोपाल ठाकूर, कपिल ठाकूर यांनी परिश्रम घेलते.महिला कार्यकारिणीमध्ये अलका सेंगर, वर्षा बिसेन, मनीषा राजपूत, डॉ. नितिका रघुवंशी, भावना ठाकूर, अलका बैस, सारिका चौहान, सुवर्णा ठाकूर, रुपम बिसेन, सपना गौर, मीना बैस, सुनील ठाकूर, कृष्णा ठाकूर, सुरेखा परिहार, श्वेता ठाकूर, वैशाली परिहार, सविता सेंगर, सुलोचना बैस, वैशाली ठाकूर, अनिता ठाकूर, अर्चना ठाकूर यांनी परिश्रम घेतले.सुखकर्ता समूहातर्फे नीलेश निकम, संजय सेंगर, राव, भांगे, परीक्षक म्हणून रणजितसिंग बिंद्रा, गजानन बोबडे, आशिष चौथे यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाGanpati Festivalगणेशोत्सव