शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या बस स्थानकाची आवारभिंत पाडली

By admin | Updated: September 26, 2014 01:46 IST

अकोला मनपाची कारवाई; रस्ता रुंदीकरणाची सबब.

अकोला : टॉवर चौकातील जुन्या बस स्थानकाची अतिक्रमित आवारभिंत मनपा प्रशासनाने जमीनदोस्त करण्याची कारवाई गुरुवारी केली. टॉवर चौक ते फतेह चौकपर्यंंत रस्ता रुंदीकरणासाठी सदर भिंत पाडण्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना मिळाली नसल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक ए.एम. सोले यांनी स्पष्ट केले.टॉवर चौक ते फतेह चौकपर्यंंत रस्ता रुंदीकरणासाठी जुन्या बस स्थानकाची आवारभिंत पाडण्याची कारवाई उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी केली. कारवाई करतेवेळी बस स्थानक परिसरातील विविध साहित्य विक्री करणार्‍या व्यावसायिकांची दुकाने काढण्यात आली. मनपाने अचानक कारवाई केल्यामुळे एसटी प्रशासनासह या ठिकाणच्या व्यावसायिकांमध्ये प्रचंड धावपळ उडाली. तत् पूर्वी दुपारी जिल्हाधिकार्‍यांसह मनपा अधिकार्‍यांनी टॉवर चौक ते फतेह चौकपर्यंंतच्या मार्गाची पाहणी केली. त्यावेळी बस स्थानकाची आवारभिंत दहा फूट रस्त्यावर येत असल्यामुळे ती पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली. यानंतर अतिक्रमण विभागाने रेल्वे स्टेशन चौकातील पोलिस चौकी हटवली.